बेकरीला आग; लाखोचे नुकसान

By Admin | Updated: May 28, 2014 00:40 IST2014-05-27T23:09:34+5:302014-05-28T00:40:39+5:30

बुलडाणा शहरातील बेकरीला आज २७ मेच्या पहाटे आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले.

Fire to Bakery; Loss of millions | बेकरीला आग; लाखोचे नुकसान

बेकरीला आग; लाखोचे नुकसान

बुलडाणा : शहरातील जयस्तंभ चौकातील सुपरस्टार बेकरीला आज २७ मेच्या पहाटे आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. टिनपत्र्यांच्या या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे बोलले जात आहे. नगरपालिकेचे अग्निशामक वाहनतळ काही फूट अंतरावर असूनही या बेकरीला वाचवू शकली नाही. आज पहाटेच्या वेळी बेकरीमधून धूर निघत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. काहींनी बेकरी मालक महंमद एजाज अब्दुल अजीम यांना कळविले. दुकानाच्या चाव्या घेऊन घटनास्थळी पोहोचेपर्यंत आगीने संपूर्ण दुकान भस्मसात केले होते. या आगीत तीन आलमार्‍या, एक इलेक्ट्रॉनिक काटा, लाकडी टेबल, तयार माल व छपराचे टिनपत्रे मिळून एक लाख ११ हजार रुपयांचा माल जळाला असल्याचा पंचनामा तलाठी देशमुख, मंडळ अधिकारी वाघ यांनी केला. दररोज या दुकानात दोन व्यक्ती झोपतात. ते पहाटेच उठून बाहेर निघून गेल्यामुळे जीवित हानी टळली. बेकरीच्या बाजूलाच कपडे विक्रीचा मोठा सेल लागलेला आहे. या सेल चालकाकडे आगीपासून वाचण्याचे कुठलेच संरक्षण साधन नाही. वेळीच ही आग आटोक्यात आल्याने हा सेलसुद्धा वाचला. आग विझविण्यसाठी परिसरातील नागरिकांनी मदत केली. बुलडाणा शहर परिसरात मागिल तीन दिवसांपासून तापमानाने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात आगी लागण्याच्या लहान-मोठय़ा घटना घडत आहेत. तर काही ठिकाणी शॉर्ट सर्किटमुळे आगी लागत आहेत. सदर आगीपासून संरक्षण मिळण्यासाठी विविध उपाय योजना करणे गरजेचे आहे. आग विझविण्यासाठी पालिकेने सज्ज राहणे गरजेचे आहे

Web Title: Fire to Bakery; Loss of millions