शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना महिन्याला ५० बॅगच खत खरेदी करता येणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 11:59 IST

Khamgaon News साधारण २५ ते ३० हजार रुपयांपर्यंत खत शेतकऱ्याला खरेदी करता येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 
खामगाव  : शेतकऱ्यांना अनुदानित खत खरेदीसाठी दरमहा ५० बॅगची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे आता एका शेतकऱ्याच्या नावे फक्त ५० बॅग खत दर महिन्याला खरेदी करता येणार आहे. म्हणजे साधारण २५ ते ३० हजार रुपयांपर्यंत खत शेतकऱ्याला खरेदी करता येणार आहे. केंद्र शासनाच्या रसायन व उर्वरक मंत्रालयाचे डीबीटी संचालक निरंजन लाल यांनी  २१ जानेवारी रोजी कृषी यंत्रणेला पत्राद्वारे सूचित केले आहे.यापूर्वी  शेतकरी कुटुंबातील एका व्यक्तीच्या नावावर खत खरेदी व्हायचे; मात्र दोनपेक्षा जास्त सदस्यांच्या नावावर शेती असायची. त्यामुळे एकाच व्यक्तीच्या नावावर मोठ्या प्रमाणात खते खरेदी केल्याचे दिसत होते. खतांची खरेदी अमर्यादित केली जायची. आता आधार कार्डनुसार एका शेतकऱ्याला केवळ ५० बॅग खताची खरेदी महिन्याला करता येणार आहे. त्यामुळे किती शेतकऱ्यांना किती खत विकण्यात आले, किती शेतकऱ्यांनी खत खरेदी केले, याची माहिती संकलित होण्यासही मदत होणार आहे. या निर्णयामुळे खतांची खरेदी-विक्री ऑन रेकॉर्डवर दिसणार आहे. त्याचबरोबर खते खरेदी करणाऱ्या शेतकऱ्याचा अंगठा पॉस मशीनवर लावून विक्री होणार असल्याने पारदर्शकता येणार आहे. तसेच व्यापाऱ्यांवरील कारवाई टळणार आहे.

टॅग्स :khamgaonखामगावAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी