शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
2
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
3
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
4
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
5
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
6
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
7
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
8
LPG ग्राहकांसाठी सूचना! छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते; सरकार लोकांना का करतंय अलर्ट?
9
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
10
चाणक्य नीती: ऑफिस असो वा घर, प्रगतीसाठी नेहमी लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले 'हे' १० नियम!
11
महाग सोन्यामुळे भारताची तिजोरी का रिकामी होत चालली आहे?
12
"ट्रम्प ब्रँड विषारी झालाय" म्हणत ट्रम्प टॉवरचा प्रकल्पच गुंडाळला; ऑस्ट्रेलियात बिल्डरकडून 'करेक्ट कार्यक्रम'
13
अजब-गजब सवय... गेली ८ वर्ष एकच अंडरवेयर घालून खेळतोय ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू एडरसन
14
फ्री वायफायच्या नादात चुकूनही करू नका 'हे' काम; अन्यथा एका मिनिटात बँक बॅलन्स होईल झिरो!
15
Palmistry: सरकारी नोकरी, खाजगी नोकरी की व्यवसाय? तुमच्या हातावरील रेषा काय सांगतात? 
16
Video - १ कोटीची नोकरी सोडून अपार्टमेंट्समध्ये करते साफसफाई; म्हणाली, "पैसा म्हणजे स्वातंत्र्य"
17
Tata Altroz CNG AMT: ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका, टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!
18
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
19
Tata Trusts Row: ३६ वर्षांपूर्वीच्या शेअर ट्रान्सफरवरुन नवा वाद; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांना नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

शेतकर्‍यांनो, पावसाळा लांबला; चिंता नाही!

By admin | Updated: June 25, 2014 00:02 IST

१५ जुलैपर्यंत करा पेरणी : कृषी विज्ञान केंद्राचे आवाहन

जयदेव वानखडे / जळगाव जामोद
मृग नक्षत्र संपले तरी मान्सुनचा पाऊस आला नाही म्हणून शेतकरी हवालदिल होवून आता पुढे काय पेरायचे ह्या चिंतेत आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी सध्या तरी चिंता करण्याचे कारण नाही. आपत्कालीन पीक नियोजन करून परिस्थितीला सामोरे जाणे हेच हितावह आहे. कृषी हवामान शास्त्रीय दृष्टीकोनातून विदर्भ विभाग प्रामुख्याने तीन हवामान उपविभागांमध्ये विभागला गेलेला आहे. हमखास पावसाचा प्रदेश, मध्यम पावसाचा प्रदेश आणि जास्त पावसाचा प्रदेश असे असले तरी सार्वत्रिक स्वरूपाच्या कमी दाबाच्या पट्टयापासून मिळणारा पाऊस हा संपूर्ण विदर्भात एकाचवेळी पडतो. पावसाच्या प्रमाणात मात्र बदल असतो. कमी दाबाचा पट्टा जेव्हा संपूर्ण विदर्भावर नसतो तेव्हा मात्र विदर्भातील पावसाच्या प्रमाणात जिल्हा तसेच तालुकानिहाय मोठय़ा प्रमाणावर बदल आढळून येतात. नियमित पावसाळा जेव्हा सुरू होतो तेव्हा साधारण तीन दिवसात संपूर्ण विदर्भात पाऊस पोहचतो. सर्वसाधारणपणे ११ ते १७ जून दरम्यान विदर्भात नियमित मोसमी पाऊस येतो. परंतु यावर्षी नियमित वेळेवर मोसमी पावसाला सुरूवात झाली नाही. पावसाळा जर एक ते दोन आठवडे उशीरा सुरू म्हणजेच (२५ जून ते १ जुलै) पर्यंत झाला तर पीक नियोजनात कोणतेही बदल करण्याची गरज नसते म्हणून शेतकरी बंधुंनी पाऊस सुरू होण्याची वाट पाहून पेरणीयोग्य पाऊस १ जुलैपर्यंत झाल्यास जी पीके आपण घेणार आहोत त्या पिकांची विद्यापीठाचे शिफारशीनुसार पेरणी करावी त्यात बदल करण्याची गरज नाही. परंतु १ जुलैपर्यंत पाऊस न झाल्यास पीक नियोजनात काही बदल करून पेरणी करावी लागेल जेणेकरून अशा परिस्थितीतही आपण चांगले उत्पादन घेऊन परिस्थितीवर काही प्रमाणात मात करण्यात यशस्वी होवून परिस्थिती सुसह्य होईल. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांनी आपत्कालीन पीक नियोजन करावे, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र जळगाव जा. मार्फत करण्यात आले आहे. पाऊस उशिराने आला तरी पीक नियोजन बदल करून चांगले उत्पन्न घेता येते. तर १५ जुलैपर्यंत पेरणीचा योग्य काळ आहे.