बुलडाणा : धकाधकीच्या जीवनामुळे सध्या कौटूंबिक कलहाचे प्रमाण वाढले आहे. बुलडाणा येथील महिला सहाय्यता व समुपदेशक केंद्रात विवाहीत महिला व मुलींच्या शारीरिक व मानसिक छळाच्या १३७ प्रकरण एप्रिल २0१६ ते मार्च २0१७ या एक वर्षाच्या काळात दाखल झालेल्या होत्या. त्यापैकी ४५ जोडप्यांचे समुपदेशन करण्यातून त्यांचे संसार पुन्हा फुलविण्यात समुपदेशन केंद्राला यश मिळाले आहे.बदलत्या जीवनशैलीमुळे पती-पत्नीमधील लहानसहान वैचारिक मतभेद विकोपाला जाऊन त्यांचे संसार मोडकळीस येत असलेल्याचे प्रकार वाढले आहे. हा वाद जर घराच्या चार भिंतीच्या आत सोडविता आला नाही, तर त्याचे परिणाम त्यांच्या मुलाबाळावर आणि कुटुंबावर होतात. त्यामुळे पतीपत्नीमध्ये निर्माण झालेले वाद समुपदेशनातून सोडवून त्यांच्या समेट घडवून आण्याचे काम शहरातील समुपदेशक केंद्रातून अविरत सुरु आहे. पतीपत्नीच्या संसारात सासु-सासरे व इतर नातेवाईकांच्या विनाकारण हस्तक्षेप वाढल्यामुळे समाजात प्रत्येक घरात वैचारिक मतभेद निर्माण होवून वाद होता. यावर महिला व नवविवाहीत मुलींवर अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. गत वर्षभरात शारीरिक व मानसिक अत्याचाराच्या तब्बल १३७ प्रकरण असल्याची नोंद असल्याची माहिती आहे. अशी कौटूबिंक प्रकरण पोलिस स्टेशन आणि न्यायालयात न जावून देता, पतीपत्नीचे समुपदेशन करुन मिटविण्याचे कार्य खामगाव, चिखली, मेहकर, बुलडाणा या ठिकाणी असलेल्या समुपदेशन अविरत करीत आहे. गत वर्षभरात प्राप्त झालेल्या एकूण तक्रारीपैकी ४५ जोडप्यांची मानसिकता बदलवून त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम केंद्राच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
कौटूंबिक कलहाचे प्रमाण वाढले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2017 02:38 IST