शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

नेत्र पेढ्यांमधील नेत्र संकलन बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2017 00:11 IST

वैद्यकीय नियमांची पुर्तता केली नाही: शेकडो नागरिकांचा नेत्रदानाचा संकल्प

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात नेत्रदानाचा संकल्प करणारी व नेत्रदान करणाऱ्या दात्यांची संख्या मोठी आहे. मात्र जिल्ह्यात असलेल्या बुलडाणा व खामगाव येथील दोन शासकीय नेत्रपेढीतील नेत्र संकलनाचे काम गत काही वर्षांपासून थंडबस्त्यात आहे. वैद्यकिय नियमांची पुर्तता न केल्यामुळे नेत्रपेढीचे बुलडाण्यातील दोन नेत्रपेढीतील नेत्रसंकलन कार्य सध्या बंद आहे. जिल्ह्यातील दरवर्षी हजारो नागरिक नेत्रदानाचा संकल्पक करतांना, शिवाय मरणोत्तर नेत्रदान केल्याच्या उदाहरणही बरीच आहे. नेत्रदान करुन ईच्छीणाऱ्यांसाठी बऱ्याच वेळा जिल्ह्यातील आरोग्य केंद्र व इतर रुग्णालयाकडे नेत्रदान संकल्प पत्र नसल्यामुळे अशा नागरिकांना बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले जाते. शिवाय नेत्रदान शस्त्रक्रिया करण्यासाठी ही बुलडाणा येथील वैद्यकिय पथकालाच पाचारण करण्यात येते. मात्र नेत्रसंकलनाची सुविधा नसल्यामुळे मोजक्या खाजगी रुग्णालयात नेत्रदानासाठी शस्त्रक्रिया केली जाते. जिल्ह्यात बुलडाणा येथील नेत्र पेढी सुरु असून येथील नेत्रसंकलन सद्या बंद आहे. तर खामगाव येथील नेत्रपेढी पुर्णता: बंद आहे. खामगाव येथून नागपूला नेत्र संकलानासाठी पाठविण्यात येत होते. मात्र हे अंतर सुमारे ३०० किलोमीटरचे असल्याने डोळे पाठविताना प्रचंड काळजी घ्यावी लागत होती. शिवाय वैद्यकिय सेवा व अटींची पुर्तता न केल्यामुळे जिल्ह्यातील नेत्रसंकलनाचे काम बंद करण्यात आले. आयबॉलची बसमधून होते वाहतूकबुलडाणा जिल्ह्यात नेत्र शस्त्रक्रिया झाल्यानंतर प्राप्त होणाऱ्या नेत्रबुब्बुळ (आयबॉल) जालना नेत्रपेढीला पाठविण्यासाठी आरोग्य विभागाकडे स्वतंत्र्य व्यवस्था नसल्यामुळे परिवहन महामंडळाच्या बसचे सहकार्य घेतले जाते. जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयबॉल अ‍ॅन्टी बायोटिक्स औषधीसह बर्फाच्या पेटीत बंद बस चालकाकडे दिले जाते.बस जालन्या पोहचल्यानंतर पेढीतील कर्मचारी बसचालकाडून सदर नेत्र बुब्बुळ संकलित केले जाते.