आठवडा उलटूनही अभ्यासक्रमाचा ‘श्री’गणेशा नाही

By Admin | Updated: July 3, 2015 23:45 IST2015-07-03T23:45:05+5:302015-07-03T23:45:05+5:30

अभ्यासक्रम बदलाचाही घोळ, दोन महिन्यांचे वेतन न मिळाल्याने शिक्षकांची अनास्था.

Even after the week, there was no 'Sri' in the syllabus | आठवडा उलटूनही अभ्यासक्रमाचा ‘श्री’गणेशा नाही

आठवडा उलटूनही अभ्यासक्रमाचा ‘श्री’गणेशा नाही

खामगाव : सन २0१५-१६ या शैक्षणिक वर्षाच्या शालेय शिक्षण सत्रास २६ जूनपासून सुरूवात झाली आहे. मात्र, शहरातील बहुताशं शाळांमध्ये आठवडा उलटल्यानंतरही अभ्यासक्रमाचा श्रीगणेशा झाला नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे. यामध्ये नगर पालिकेच्या शाळांसह शहरातील खासगी शाळांचा प्रामुख्याने समावेश असून अनेक संस्थाचालक नफ्याचे गणित सोडविण्यात गुंग असल्याचे चित्र आहे. कुठलिही शाळा हे ज्ञानदानाचे पवित्र मंदिर मानले जाते. मात्र, आधुनिक युगात शाळांही व्यापाराचे केंद्र बनल्याची वस्तुस्थिती आहे. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांंंना प्रवेशासाठी शासनाच्या नियमांना डावलून भरमसाठ शुल्क आकारल्या जाते. पालक आपल्या पाल्याला दज्रेदार शाळेत प्रवेश देण्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजायला तयार असतात. काही पालक विद्यार्थ्याला एखाद्या शाळेत प्रवेश देण्यासाठी प्रतिष्ठेचाही मुद्दा बनवितात. मात्र, प्रवेश घेतल्यानंतर त्या शाळेतील शिक्षणाचा दर्जा उत्तम असेलच असे नाही. दरम्यान, शहर आणि परिसरातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना गेल्याच आठवड्यात म्हणजे २६ जून रोजी सुरूवात झाली. शाळा सुरू होवून जवळपास आठवड्याचा कालावधी लोटला आहे. परंतु, या पैकी अनेक शाळांमध्ये शिक्षकांनी अभ्यासक्रमाला सुरूवात केली नसल्याची वस्तुस्थिती आहे. दरम्यान, इयत्ता पाचवीच्या सेमी इंग्रजीचा घोळही पुढे आला आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक संभ्रमात पडले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून शिक्षकांना वेतन मिळाले नाही. मे आणि जून महिन्याचे वेतन रखडल्यामुळे शिक्षकांच्या पाल्यांच्याच शैक्षणिक प्रवेशासह साहित्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश शाळांमध्ये शिक्षणाचा बट्टयाबोळ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. नगर पालिका शिक्षकांसह कर्मचार्‍यांनाही वेतन मिळालेले नाही.

Web Title: Even after the week, there was no 'Sri' in the syllabus