मारहाणप्रकरणी भावंडांना सक्तमजुरी

By Admin | Updated: July 30, 2015 23:17 IST2015-07-30T23:17:07+5:302015-07-30T23:17:07+5:30

खामगाव येथील न्यायालयाने ठोठावली दोन आरोपींना तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा.

Empowering the brothers | मारहाणप्रकरणी भावंडांना सक्तमजुरी

मारहाणप्रकरणी भावंडांना सक्तमजुरी

खामगाव (जि. बुलडाणा ): न्यायालयीन कागदपत्रे दिली नाहीत, या कारणावरून एकास मारहाण केल्याप्रकरणी दोघा भावांना तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. हा निकाल गुरुवारी खामगाव येथील न्यायालयाने दिला. तालुक्यातील ढोरपगाव येथील शंकर दयाराम तांगडे यास गावातीलच गणेश नारायण हाडे व सुभाष नारायण हाडे या दोघा भावांनी न्यायालयीन कागदपत्रे मागितली असता, त्यांनी न दिल्याच्या कारणावरून मारहाण करण्यात आली होती. यामध्ये शंकर तांगडे यांचे दोन दात पडले व ते जखमी झाले. ही घटना ७ जुलै २0१0 ला घडली होती. याप्रकरणी शंकरचे वडील दयाराम तांगडे यांनी पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंविच्या कलम ३२४ नुसार गुन्हा दाखल करून तपासाअंती प्रकरण न्यायप्रविष्ट केले होते. याप्रकरणी खामगाव येथील न्यायालय क्र. २ मध्ये गुरूवारी सुनावणी करण्यात आली. सुनावणीदरम्यान सात साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने कलम ३२३ नुसार गणेश हाडे व सुभाष हाडे या दोघा भावांना दोषी ठरवून तीन महिने सक्तमजुरी, एक हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिन्याची शिक्षा ठोठावली. दंडातून २ हजार जखमीला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे न्यायालयाने निकालात नमूद केले आहे. सदर निकाल न्यायाधीश डी.आर. दंडे यांनी दिला. सरकारी अभियोक्ता म्हणून अजय इंगळे यांनी काम पाहिले.

Web Title: Empowering the brothers