शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

वीज पंपाचे स्टार्टर दगडाने ठेचले

By admin | Updated: December 20, 2014 00:27 IST

पिंपळगाव सोनारा येथील घटना : बारा शेतक-यांचे नुकसान.

साखरखेर्डा (सिंदखेडराजा, जि. बुलडाणा) : सिंदखेडराजा तालुक्यातील पिंपळगाव सोनारा येथील १२ शेतकर्‍यांच्या शेतातील साहित्याचे लाखो रुपयांचे नुकसान अज्ञात माथेफिरूने केल्याची घटना १७ डिसेंबरच्या रात्री घडली आहे. पिंपळगाव सोनारा येथील गुलाबराव वायाळ, मारोती वायाळ, एकनाथ पंजरकर, जगाराव पंजरकर, शंकर वायाळ, गणेश कनखर, तेजराव पंजरकर, हनवंता पंजरकर यांच्सासह १२ शेतकर्‍यांच्या शेतात जाऊन अज्ञात माथेफिरूंनी मोटारीचे स्टार्टर दगडाने ठेचून नष्ट केले. त्यानंतर बोअरवेलचे केबल आणि पाईप तोडून बोअरवेलमध्ये टाकले. विहिरीवरील पंप तोडून मोटारसह पाण्यात टाकले, केबल तोडून विहिरीत फेकून देला. असले विचित्र प्रकार अज्ञात माथेफिरूने केल्याने १२ शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गुलाबराव वायाळ यांच्या शेतातील स्पिंकलर पाईपचे तुकडे करून इतरत्र फेकून दिले; परंतु यातील एकही वस्तू चोरून नेली नाही. मागील वर्षीसुद्धा असाच प्रकार या गावात घडला हो ता. रब्बी पिकाचा हंगाम सुरू असल्याने नेमके विद्युत साहित्याचे नुकसान केल्याने त्या शेतकर्‍यांना नव्याने साहित्य खरेदी करावे लागत आहे. दरवर्षी हा प्रकार घडत असल्याने शेतकरी वैतागले आहेत, अशी माहिती तंटामुक्तीचे अध्यक्ष तोताराम ठोसरे यांनी दिली.