शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या प्रचाराचे तंत्र बिघडलेय

By admin | Updated: October 9, 2014 00:37 IST

बुलडाणा जिल्ह्यातील उमेदवारांचा प्रचार एकमेकांची उणे-दुणे काढण्यापुरताच.

बुलडाणा : विधानसभा निवडणुकीचा माहौल अगदीच रंगतदार होऊ घातला आहे. या प्रचाराच्या धामधुमीत स्थानिक समस्यांचा ओझरता उल्लेख करीत विकासाची ब्ल्यू-पिंट्र कोणीच मांडत नाही. महायुती, आघाडी यांचा घटस्फोट झाल्याने प्रचाराचे तंत्रच बिघडलेय. प्रचारात स्थानिक कृषी समस्या, उद्योग, बेरोजगारी, भारनियमन, विकास कामे आदींचा नाममात्र समावेश केला जात आहे. स्वबळाच्या या राजकारणात केवळ एकमेकांची पिसे काढण्यावर उमेदवार, नेते व राजकीय पक्षांचा भर असल्याने मतदारांचे मात्र मनोरंजन होत आहे.सर्वच मतदारसंघात विद्यमान आमदारांद्वारे मतदारसंघात झालेली विकास कामे, पुढच्या पाच वर्षांत होणारी विकास कामे, सुटलेल्या समस्या आदींचा पाढा वाचून मतांचा जोगवा मागितला जात आहे. याउलट विरोधी पक्षाचा उमेदवार पाच वर्षांतील उणिवा शोधून त्यावर प्रहार करीत आहे; तसेच म तदारसंघातील सर्व समस्या सोडविण्यासाठी केवळ आपणच कसे सक्षम व एकमेव पर्याय आहोत, या अविर्भावात प्रचार करण्याचे पूर्वापार तंत्र अजूनही सुरूच आहे. मात्र काही मतदारसंघात तर थेट उमेदवारांच्या खाण्यापिण्याच्या सवयीपासून तर शारीरिक उंची व व्यंगावरही भाष्य करून प्रचाराचा स् तर खाली उतरविला जात आहे. त्याच बरोबर राजकीय पक्षाच्या प्रचारातून आजच्या जिल्ह्यातील प्रश्नाबाबत मौन बाळगल्या जात आहे. *सोयाबीनचे हाल बेदखलकपाशी व सोयाबीनच्याच पिकांच्या उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. सध्या सोयाबीनवर किडीचे संकट असून, कपाशीला पाणी देण्यासाठी शेतात वीज नाही, हे संकट निवडणुकीच्या धामधुमीत दुर्लक्षित केले जात आहे.*जगाचा पोशिंदा आशेवरदरवर्षी शेती दगा देत आहे. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ, अशी संकटांची मालिका शेतकर्‍यांच्या मागे सुरू आहे. कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. जिल्ह्यात लाखो हातांना काम नाही. शेतीपूरक धंदे नाहीत. मतदारसंघातील समस्या जैसे थे आहेत. उद्या तरी नवी पहाट उगवेल, या आशेवर शेतकरी आहेत.

*उद्योगांची वाच्यता नाही जिल्ह्यातील खामगाव व मलकापूर येथील औद्योगिक वसाहत ही एकमेव एमआयडीसी आहे. परंतु येथेही आता पाण्याची समस्या जाणवू लागली आहे. याशिवाय बुलडाणा, चिखली परिसरातील एमआयडीसीत सुविधा नसल्याने कोणतेही उद्योग नाहीत. त्यामुळे नवीन उद्योजक यायला तयार नाही त.