शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

हाणामारीत आठ गंभीर जखमी

By admin | Updated: August 7, 2015 01:03 IST

बोरगाव काकडे ग्रामपंचायत निवडणुकीच्या उत्साहाला गालबोट.

अमडापूर (जि. बुलडाणा): ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल गुरुवारी दुपारी २ वाजता जाहीर झाल्यानंतर चिखली तालुक्यातील बोरगाव काकडे येथील निवडणुकीच्या उत्साहाला गालबोट लागले. पराभूत पॅनलच्या काही लोकांना विजयी झालेल्या पॅनलच्या लोकांवर लाठ्याकाठ्या व लोखंडी रॉडने हल्ला केल्यामुळे आठ जण गंभीर झाले. ही घटना आज ६ आॅगस्ट रोजी दुपारी ३ च्या सुमारात घडली. सर्व जखमींना बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र प्रकृती गंभीर असल्यामुळे सर्वांना अकोला येथे रेफर करण्यात आले आहे.चिखली तालुक्यातील अमडापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोरगाव काकडे येथे ग्रामविकास प्रगती पॅनल विरुद्ध बळीराजा पॅनल अशा दोन पॅनलमध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक लढविली गेली. गुरुवारी दुपारी जाहीर झालेल्या निकालानंतर प्रगती पॅनलचे सहा उमेदवार विजयी झाले, तर बळीराजा पॅनलचे तीन उमेदवार विजयी झाले; मात्र विजयोत्सवादरम्यान गावात वाद उफाळून आला. दरम्यान, विजयी मिरवणुकीनंतर काही लोकांनी लाठ्याकाठ्या व लोखंडी रॉडने विजयी पॅनलच्या सदस्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात ग्रामविकास प्रगती पॅनलचे रमेश काकडे, बंडू काकडे, वसंतराव काकडे, गजानन काकडे, संजय काकडे, गुलाबराव काकडे, विजय काकडे, शोभा काकडे आदी जखमी झाले. यानंतर ग्रामस्थांनी सर्वांना बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले; मात्र प्रकृती गंभीर असल्यामुळे सर्वांना अकोला येथे रेफर करण्यात आले आहे.