शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

पगाराविना होणार उर्दू शिक्षकांची ईद

By admin | Updated: July 15, 2015 23:18 IST

बुलडाणा जिल्ह्यातील प्रकार; ईदची खरेदी उधारीवर, उर्दू शिक्षकांमध्ये रोष.

बुलडाणा : दिवाळी, ईद यांसारख्या सणापूर्वी कर्मचार्‍यांना अग्रिम वेतन देण्यात येत असते; मात्र जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे जिल्ह्यातील उर्दू शिक्षक वेतनापासून वंचित आहेत. त्यामुळे रमजान ईद सणाच्या पूर्वसंध्येला त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. बुलडाणा जिल्हा परिषद अंतर्गत एकूण ७ हजार १३८ शिक्षक कार्यरत आहेत. त्यांना प्रत्येक महिन्यात २७ कोटी रुपये वेतन देण्यात येते, तर ईद-दिवाळी सणासाठी एक-दोन महिन्यांपूर्वी वेतन देण्याचे नियोजन करण्यात येते. त्यामुळे सण-उत्सवादरम्यान विविध साहित्य खरेदीसंबंधी अडचणी येत नाहीत. यावर्षी रमजान महिना सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेने निवेदन देऊन जून महिन्याचे वेतन तसेच जुलै २0१४ ते जानेवारी २0१५ दरम्यानचा महागाई भत्ता ईद सणापूर्वी १३ जुलै रोजी वितरित करावा, अशी मागणी केली होती; मात्र १३ पंचायती समित्यांपैकी फक्त ११ समित्यांची वेतन बिले जिल्हा परिषद शिक्षण विभागाला मिळाली आहेत. खामगाव व नांदुरा पंचायत समितीचे वेतन बिले अप्राप्त आहेत. वेतन बिले वेळेवर न मिळाल्यामुळे जिल्हा कोशागार कार्यालयात बिले उशिरा टाकण्यात आली. त्यामुळे बुलडाणा, मोताळा, मलकापूर, जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव, चिखली, मेहकर, लोणार, देऊळगावराजा व सिंदखेड राजा या ११ पंचायत समित्यांचे २३ कोटी ७९ लाख रुपये वेतन जिल्हा कोशागार अधिकारी कार्यालयात पाठविण्यात आले आहे. तथापि, पैसे बँकेत जमा होण्यासाठी कमीत कमी चार दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे उर्दू शिक्षक सध्या ईदनिमित्त साहित्याची खरेदी उधारीवर करीत आहेत. यास जबाबदार अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटनेचे अमरावती विभागीय अध्यक्ष वासिक नवेद आदींनी केली आहे. *पंचायत समितीकडे देयके पाठविली मुख्य सणासठी कमीत कमी पाच हजार रूपये अग्रिम वेतन देण्यात येते. रमजान ईदसाठीही अग्रिम वेतन म्हणून २७ लाख १७ हजार रूपयांची देयके मंजूर करून संबंधित पंचायत समितीला पाठविण्यात आले आहे. त्यामुळे उर्दू शिक्षकांना एक-दोन दिवसांत अग्रिम वेतन मिळण्याची शक्यता आहे. तोपर्यंंत मात्र ईदचा सण निघून जातो. त्यानंतर मिळालेल्या अग्रिम वेतनाचा काहीच फायदा होणार नाही. याबाबत उर्दू शिक्षकांमध्ये रोष आहे.