शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

महाडीबीटीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 11:33 IST

Economic exploitation of farmers due to MahaDBT : सेतू केंद्रावरून ऑनलाइन अर्ज भरण्याकरिता शेतकऱ्यांना शेकडो रुपये मोजावे लागतात.

लोकमत न्यूज नेटवर्क    खामगाव : महाडीबीटीमध्ये लॉटरी पद्धतीमुळे अर्ज जास्त आणि लाभार्थी कमी अशी परिस्थिती झाली आहे. सेतू केंद्रावरून ऑनलाइन अर्ज भरण्याकरिता शेतकऱ्यांना शेकडो रुपये मोजावे लागतात. मात्र, त्यांची निवड होत नसल्याने शेतकरी रोष व्यक्त करीत आहेत. महाडीबीटीसाठी अर्ज करताना शेतकऱ्यांना कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करावी लागतात. लॉटरीमध्ये निवड झाल्यानंतर पुन्हा कागदपत्रे अपलोड करावी लागतात. त्याबाबत खात्री करून कृषी विभाग पूर्वसंमती देतो. त्याची पुढची पायरी म्हणजे खरेदीची प्रक्रिया पूर्ण करणे आणि कागदपत्रे अपलोड करणे, या सर्व प्रक्रियेमध्ये त्याला सीएससी सेंटर किंवा सेतू केंद्र यांच्याकडे जावे लागते. या केंद्रामध्ये मात्र त्यांच्या सोयीप्रमाणे शुल्क आकारले जाते. ऑनलाइन अर्जाचे शासकीय शुल्क २३ रुपये आहे. परंतु, एका अर्जाला ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात २०० ते ३०० रुपये खर्च शेतकऱ्याला येतो. त्यातही निवडीची खात्री नसते. यामुळे शेतकरी वैतागला आहे. शासनाचा हेतू जरी शुद्ध असला तरी शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा कमी आणि तोटा जास्त सहन करावा लागत आहे. त्यामुळे आकारण्यात येणाऱ्या शुल्काबाबत सेतू, सीएससी सेंटर संचालकांना स्पष्ट निर्देश द्यावेत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. कृषी विभागाची ही महत्त्वाकांक्षी योजना जरी असली तरी शेतकऱ्याला अर्ज करताना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसतो. अर्जाची निवड होईल, याची खात्री नसते. सेतू व सीएससी सेंटर यांच्याकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्कासंदर्भात एकसूत्रता आणावी, अशी मागणी हाेत आहे. 

८ हजार शेतकऱ्यांनाच मिळाले अनुदानीत बियाणे अनुदानित बियाण्यांसाठी महाडीबीटी पोर्टलमार्फत जिल्ह्यातील ६४ हजार १३७ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. यामध्ये लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आलेल्या ८ हजार ८१५ शेतकऱ्यांना अनुदानावर सोयाबीन बियाणे देण्यात आले आहे.  महाबीजने बियाण्यांचे दर कायम ठेवले आहेत.  शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलमार्फत अर्ज करून अनुदानित बियाणे मिळणार असल्याने त्यासाठी जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी बियाणे मिळतील या आशेने अर्ज केले हाेते. मात्र, त्यातील काहीच शेतकऱ्यांना हे बियाणे मिळाल्याने त्यांना महागडे बियाणे घ्यावे लागले. 

टॅग्स :khamgaonखामगावFarmerशेतकरी