शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

ई-क्लास जमिनीवर अतिक्रमणाचा प्रयत्न

By admin | Updated: June 1, 2015 02:00 IST

गावक-यांनी केले काम बंद; सरपंच व सचिवाची महसूलकडे तक्रार.

खामगाव : शिरसगाव देशमुख गट ग्रामपंचायतअंतर्गत ३ ते ४ एकराच्या परिसरात काळा साबू बनविण्याची फॅक्टरी लावण्याच्या उद्देशाने साखरखेर्डा येथील एका इसमाने काम सुरू केले. सदर काम काही गावकर्‍यांनी बंद पाडले. तसेच याबाबत माहिती मिळाल्यानंतर जमीन ग्रामपंचायतीची ई-क्लासची असून, अतिक्रमण करणार्‍यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी गावच्या सरपंच सोनाली अनिल देशमुख व ग्रामसेवक मोरे यांनी तहसीलदार यांच्याकडे ३0 मे रोजी केली आहे. खामगाव-चिखली रोडला लागून असलेल्या जनता नगर भागातील पूर्वेला ग्रामपंचायतीच्या ई-क्लास जमिनीवर काळा साबू बनविण्याची फॅक्टरी लावण्याच्या उद्देशाने दोन-तीन दिवसांपासून साखरखेर्डा येथील एका इसमाकडून जेसीबीने खड्डे खोदकाम सुरू होते. ३ ते ४ एकराच्या आवारात ग्रामपंचायतीच्या जमिनीवर अवैधरित्या कब्जा करून खोदकाम सुरू असल्याचे समजल्यानंतर जनता नगर व माथनी येथील काही नागरिकांनी तेथे जाऊन काम बंद केले. दरम्यान, पटवारी राठोड, पटवारी तायडे, ग्रामसेवक मोरे यांनी घटनास्थळावर भेट देऊन या ठिकाणचे फोटोग्राफ काढले. तसेच याबाबत ग्रामपंचायतच्या ई-क्लास जमिनीवर कोणी अज्ञात इसमाने अतिक्रमण करून मोठमोठे खड्डे पाडल्याची तक्रार सरपंच सोनाली देशमुख, ग्रामसेवक मोरे यांनी तहसीलदार खामगाव यांच्याकडे ३0 मे रोजी केली आहे. शिरसगाव गट ग्रामपंचायत अंतर्गत ई-क्लासच्या जमिनीवर अनेकांचा डोळा आहे. त्यातूनच हा प्रकार घडला असल्याचे बोलले जात आहे. काही अनुचित प्रकार घडू नाही यासाठी प्रशासनाने त्वरित दखल घेण्याची गरज आहे.