शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
3
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
4
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
5
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
6
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
7
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
8
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
9
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
10
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
11
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
12
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
13
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
14
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
15
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
16
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
17
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
18
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
19
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
20
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मळणीयंत्रात चिरडून तरुणाचा मृत्यू

By admin | Updated: October 26, 2014 23:54 IST

मळणीयंत्राद्वारे सोयाबीन काढत असताना तोल गेल्याने तरूणाचा मृत्यू, देऊळगावराजा येथील घटना.

देऊळगावराजा (बुलडाणा) : मळणीयंत्राद्वारे सोयाबीन काढत असताना तोल गेल्याने विकास भाऊराव वाघ (२४ रा. पांगरी माळी) या तरुणाचा यंत्रात चिरडून जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना चिखली रोडवर सर्मथ कृषी महाविद्यालयानजीक असलेल्या शेतात रविवारी दुपारी ४.३0 वाजता घडली. पांगरी माळी येथील दत्तात्रय लक्ष्मण वाघ यांचे शेत चिखली रोडलगत आहे. त्यांच्या शेतात सोंगणी केलेले सोयाबीन शंकर सखाराम वाघ यांच्या मळणी यंत्रातून काढण्याचे काम रविवारी सुरू होते. या मळणीयंत्रावर विकास वाघ हा तरुण यंत्रात सोयाबीन टाकण्याचे काम करत होता. रविवारी सोयाबीन काढण्याचे काम शेवटच्या टप्प्यात होते. त्यावेळी यंत्रावर जाऊन पायाने सोयाबीन ढकलत असताना तोल गेल्याने विकास वाघ पायाकडून यंत्रात ओढला गेला. यंत्र सुरू असल्याने मोठय़ा दातर्‍यामध्ये चिरडून काही क्षणातच त्याचा जागीच करुण अंत झाला. ही घटना निदर्शनास येताच तिथे उपस्थित शेतकर्‍यांनी यंत्र त्वरित बंद केले. विकास वाघ याचा गळ्यापासून ते पायापर्यंतचा भाग यंत्रात होता. फक्त डोकेच वर राहिले होते. देऊळगावराजा पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी उत्तरीय तपासणीकरिता त्याचा मृतदेह दाखल केला. रात्री नऊ वाजता मृतक विकासच्या पार्थिवावर पांगरी माळी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ग्रामीण भागात मळणीयंत्रातून सोयाबीन काढणीचे काम सध्या जोरात सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी लहान-मोठे अपघात घडतात. मात्र, मळणी यंत्रात चिरडून अवघ्या २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.