विजेचा धक्का लागून शेतमजूर ठार

By Admin | Updated: September 2, 2016 02:27 IST2016-09-02T02:27:27+5:302016-09-02T02:27:27+5:30

मेहकर तालुक्यातील शिंदी येथील घटना.

Due to the power cuts, the workers are killed | विजेचा धक्का लागून शेतमजूर ठार

विजेचा धक्का लागून शेतमजूर ठार

साखरखेर्डा (जि. बुलडाणा), दि. १: सर्वत्र पोळा सण मोठय़ा उत्साहात साजरा होत असताना शिंदी येथे शेतमजूर घरामध्ये मीटर दुरुस्त करीत असताना विजेचा धक्का लागून जागीच ठार झाल्याची घटना १ सप्टेंबरला दुपारी ३ वाजता घडली.
शिंदी येथील बागायतदार शेतकरी भगवान बंगाळे यांच्याकडे किशोर चव्हाण (वय २५) रा.मेहकर हा मजूर कामावर होता. पोळा सण असल्याने किशोर चव्हाण आणि भगवान बंगाळे यांनी बैल शेतातच धुवून घरी आणले. बैलाची सजावट करुन दारात उभे केले. काही वेळाने गावच्या वेशीत पोळा भरणार असल्याने घरात सर्व मंडळी टी.व्ही.पाहत होते. तेवढय़ात विजेच्या मीटरमध्ये बिघाड झाल्याचे किशोरच्या लक्षात आले. तो मीटरमध्ये दुरुस्ती करीत असतानाच त्याला विजेचा धक्का लागला. त्यानंतर त्याला साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तोपर्यंत किशोरचा मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकारी डॉ.जाधव यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.

Web Title: Due to the power cuts, the workers are killed