शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

चा-याअभावी पशुधन विक्रीला

By admin | Updated: December 31, 2014 00:26 IST

देऊळगाव कुंडपाळ : चाराटंचाईने पशुपालक हैराण.

देऊळगाव कुंडपाळ (बुलडाणा): अत्यल्प पावसामुळे देऊळगाव कुंडपाळ परिसरात चाराटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत, त्यामुळे पशुपालक हैराण झाले असून, चार्‍याअभावी पशुधन बाजारात विक्रीला काढले जात आहे.परिसरात यावर्षी अत्यल्प पाऊस झाला असून, खरिप हंगामातही शेतकर्‍यांना मोठय़ा प्रमाणावर फटका बसला. या अत्यल्प पावसामुळे पाणी पातळी खालावली आहे. तर जनावरांच्या चार्‍याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कोरडवाहू शेतजमीनधारकांना जनावरांच्या संगोपनाबाबत चिंता लागलेली आहे. पाण्याअभावी गवत वाढले नाही. तर ज्याठिकाणी वाढले तेही संपत चालले आहे. परिसरातील शेतकर्‍यांनी ज्वारी, बाजरी, मका या पिकाकडे पाठ फिरविली असून, सोयाबीन पिकाचा सर्वाधिक पेरा करतात. यंदाही तृणधान्य पिकाचा पेरा घटल्याने कडबा उत्पादनातही मोठय़ा प्रमाणावर घट झाली आहे. परिणामी परिसरात सोयाबीनचेच कुटार सद्यस्थितीत उपलब्ध असून, त्याचेही प्रमाण पावसाअभावी अत्यल्प आहे. सोयाबीन या प्रमुख पिकाने अल्प पावसामुळे साथ न दिल्याने शेतकर्‍यांना त्यांनी घेतलेले पीककर्ज परतफेड करणे अशक्य होऊन बसले आहे. परिसरात चाराटंचाईबरोबर सोयाबीनचे कुटारही महागले असल्याने पशुपालक आपली जनावरे बाजारात विक्रीला काढत आहेत. सद्यस्थितीत गाय, बैल, म्हैस, शेळ्या आदी जनावरांनी बाजार हाऊस फुल्ल झालेला दिसून येत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन परिसरात चारा डेपो उघडावा, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे.