शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय रुग्णालयामध्ये औषधांचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 14:12 IST

रुग्णाच्या नातेवाईकांना बाहेरून औषधी सांगितल्या जाते तर औषधांविना रुग्णांना वेळेवर उपचार सुद्धा मिळत नसल्याचेही वास्तव आहे.

- योगेश फरपटलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : आरोग्य यंत्रणेकडून लाखो रुपयांची औषधे पुरवली जात असतांना जिल्हयातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामिण रुग्णालयामध्ये औषधांचा तुटवडा असल्याचे दिसून येते. काही ठिकाणी रुग्णाच्या नातेवाईकांना बाहेरून औषधी सांगितल्या जाते तर औषधांविना रुग्णांना वेळेवर उपचार सुद्धा मिळत नसल्याचेही वास्तव आहे.अनेकदा औषधाअभावी रुग्णांचे डॉक्टरसोबत वाद होत आहेत. गत वर्षी वैद्यकीय यंत्रणेच्या भोंगळ कारभाराचा बळी भोनगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. धिरज जमादार हे ठरले होते. तरीसुद्धा आरोग्य यंत्रणा सुधारली नसल्याचे दिसून येते. राज्यशासनाच्या बजेटमध्ये आरोग्य विभागाच्या खर्चावर तरतुद केली जाते. जागतिक आरोग्य संघटना (डब्लू.एच.ओ) मार्फत सुद्धा कोट्यवधी रुपयांचा निधी केंद्र शासनाला मिळत असतो. असे असतांनाही दवाखान्यात औषधांचा तुटवडा असणे गंभिर बाब आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय व सामान्य रुग्णालय वगळता ५२ प्राथमिक आरोग्य केंद्रे व १४ ग्रामिण रुग्णालय जिल्ह्यात आहेत. औषधांअभावी रुग्णांचा जीव धोक्यात असणे गंभिर बाब आहे. प्रत्येक रुग्णालयावर देखरेख ठेवण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या देखरेखीत रुग्ण कल्याण समिती कार्यरत असते. रुग्णालयात भोंगळ कारभार सुरु असतांना रुग्ण कल्याण समिती करतेय तरी काय असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. मलकापूर, शेगाव व खामगाव येथील शासकीय रुग्णालयातील डॉक्टर्स जाणिवपूर्वक औषध उपलब्ध नसल्याचे कारण सांगून बाहेरून औषध आणायला सांगतात. सध्या सर्वत्र डेंग्यूसह मलेरिया यासारख्या आजाराने रुग्ण त्रस्त झाले आहेत. प्रत्येक ग्रामिण रुग्णालयात रुग्णांची गर्दी दिसत आहे. शासकीय रुग्णालयात उपचार मिळत नसल्याने काही रुग्ण कंटाळून खासगी रुग्णालयाचा आधार घेत आहेत.प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रस्तरावर औषधसाठा उपलब्ध आहे. दोन दिवसापूर्वीच काही ठिकाणी भेट देवून चौकशी केली आहे.- डॉ. बाळकृष्ण कांबळे,जिल्हा आरोग्य अधिकारी, बुलडाणा.उपजिल्हा रुग्णालय किंवा ग्रामिण रुग्णालयस्तरावर बाहेरून कुणी औषध लिहून देत असेल तर ते चुकीचे आहे. औषध साठा सर्वत्र उपलब्ध आहे.- प्रेमचंद पंडीत,जिल्हा शल्य चिकित्सक, बुलडाणा

 

टॅग्स :khamgaonखामगावhospitalहॉस्पिटलmedicinesऔषधं