शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
3
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
4
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
5
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
6
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
7
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
8
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
9
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
10
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
11
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
12
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
13
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
14
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
15
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
16
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
17
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
18
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
19
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
20
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाचा मदतनिधी थेट बँक खात्यात

By admin | Updated: January 11, 2015 00:26 IST

पहिल्या टप्प्यात मिळाले ११९ कोटी; बुलडाणा जिल्हाधिका-यांनी तत्काळ वितरित केला तालुकास्तरावर निधी.

बुलडाणा : अपुरा पाऊस, लांबलेली पेरणी, त्यानंतर परतीच्या पावसाने दिलेला फटका व ऐन पीक काढणीच्या वेळी आलेली गारपीट अशा नैसर्गिक संकटामुळे दुष्काळात सापडलेल्या शेतकर्‍यांसाठी शासनाने जाहीर केलेल्या मदतीमधील ११९ कोटी ७४ लाखाचा निधी १0 जानेवारीला जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. हा निधी जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर यांनी आजच तत्काळ तालुकास्तरावर वितरीत केला असून, ही मदत संबंधित शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यावर्षीच्या खरीप हंगामात अत्यल्प पाऊस झाल्याने जिल्ह्यात मूग, उडीद, ज्वारी इत्यादी पिके शेतकर्‍यांच्या हातून गेली, तसेच कापूस, सोयाबीन पिकाचे उत्पादन घटले. खरिपाची सरासरी आणेवारी ५0 पैशाखाली असल्याने दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यातील तेराही तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. ५ लाख ४८ हजार ६६७ लाख शेतकर्‍यांना या दुष्काळाचा फटका बसला आहे. या शेतकर्‍यांना एकूण २८७ कोटी ९४ लाखांची मदत जाहीर करण्यात आली असून, त्यापैकी ११९ कोटी ७४ लाखांची मदत प्राप्त झाली आहे.