शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी पॅकेजची मदत दीड लाख शेतकऱ्यांच्या खात्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 13:42 IST

बुलडाणा: अवर्षणाचा फटका बसलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील दीड लाख शेतकर्यांच्या खात्यात ६७ कोटी दहा लाख रुपयांची आर्थिक मदत जमा करण्यात आली.

बुलडाणा: अवर्षणाचा फटका बसलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील दीड लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ६७ कोटी दहा लाख रुपयांची आर्थिक मदत जमा करण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात प्राप्त ५९ कोटी रुपये व नंतर पुन्हा ५९ कोटी रुपये असे ११८ कोटी रुपये बुलडाणा जिल्ह्याला प्राप्त झाले होते. तिसर्या टप्प्यात ८१ कोटी रुपये जिल्ह्याला प्राप्त झाले असून येत्या दोन दिवसात या रकमेचेही वाटप केले जाणार असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले.पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील आठ तालुक्यात दुष्काळ घोषित करण्यात आला होता. या तालुक्यातील ८३४ गावे दुष्काळाच्या कचाट्यात सापडले होते. केंद्रीय पथकाने पाहणी केल्यानंतर बुलडाणा जिल्ह्यातील शेतकर्यांसाठी २८८ कोटी रुपयांची मदत मागण्यात आली होती. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ५९ कोटी रुपये बुलडाणा जिल्ह्याला देण्यात आले होते. त्यानंतर लगेच दुसरा हप्ताही ५९ कोटी रुपयांचा जिल्ह्याला मिळाला होता. अशा १८८ कोटी रुपयांच्या वाटपासाठी ८३४ गावांपैकी ५९९ गावांतील एक लाख ९८ हजार सहा शेतकर्यांच्या याद्याही मदतीच्या वाटपासाठी तयार करण्यात आल्या आहेत. दरम्यान, या पैकी आतापर्यंत एक लाख ५९ हजार २१८ शेतकर्यांच्या खात्यात ६७ कोटी १० लाख ८९ हजार ८३८ रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. वार्षिक सरासरीच्या २३ टक्के पाऊस जिल्ह्यात कमी पडला होता. पडणारा पाऊसही कमीत कमी ९ ते अधिकाधिक २३ दिवासापर्यंतचा खंड देत पडल्याने जिल्ह्यातील खरीप हंगामाला मोठा फटका बसला होता. या पृष्ठभूमीवर केंद्रीय पथकाने पाहणी केली होती. जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी तीव्र आंदोलनेही झाली होती. त्यानंतर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाला होता. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यातील शेतकर्यांना दुष्काळातील नुकसान भरपाईपोटी २८८ कोटी रुपायंची अवश्यकता असल्याचे स्पष्ट झाले होते.या पृष्ठभूमीवर पहिल्या टप्प्यात जिल्ह्याला ५९ कोटी रुपयांचे दुष्काळी अनुदान वाटपासाठी मिळाले होते. त्यानंतर दुसरा हप्ताही ५९ कोटी रुपयांचा मिळाला होता. त्यामुळे जवळपास १८८ कोटी रुपयांपैकी ६७ कोटी दहा लाख रुपयांचे एक लाख ५९ हजार २१८ शेतकर्यांच्या खात्यात दुष्काळी नुकसानापोटी ही मदत जमा करण्यात आली आहे. प्राप्त निधीपैकी ५७ टक्के निधीचे वाटप आतापर्यंत करण्यात आलेले आहे. उर्वरीत ८९ कोटी रुपयांची अद्याप जिल्ह्याला प्रतीक्षा आहे.

तिसऱ्या टप्प्यात ८१ कोटी४दरम्यान, दुष्काळी पॅकेजअंतर्गत बुलडाणा जिल्ह्याला तिसर्या टप्प्यात आणखी ८१ कोटी रुपयांचा निधी प्राप्त होत असून येत्या दोन ते तीन दिवसात त्याचे वाटप करण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. २८८ कोटी रुपयांपैकी १९९ कोटी रुपयांचा निधी आतापर्यंत बुलडाणा जिल्ह्याला प्राप्त झाला आहे.तीन तालुक्यात ६० टक्के निधी वाटप४जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात ८० टक्के दुष्काळी मदत वाटप करण्यात आली असून २५ हजार ४३१ शेतकर्यांच्या खात्यात ती जमा झाली आहे. सिंदखेड राजा तालुक्यातही ७० टक्के मदत वाटप झाली असून २८ हजार ७९६ शेतकर्यांच्या खात्यात ११ कोटी २२ लाख ३१ हजार ६८६ रुपये जमा करण्यात आले आहे तर मलकापूर तालुक्यातील १३ हजार ८१७ शेतकर्यांच्या खात्यात ६८ कोटी १८ लाख चार हजार ७२३ रुपयांची मदत जमा करण्यात आली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाdroughtदुष्काळFarmerशेतकरी