शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

सिमेंट, लोखंडच्या वाढत्या दरामुळे गरीबांच्या घराचे स्वप्न अधुरेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:51 IST

बांधकाम क्षेत्रात उपयुक्त असलेल्या अतिमहत्वाचा घटक म्हणून सिमेंट व लोखंडाचा (स्टिलचा) वापर करण्यात येतो. गेल्या दोन वर्षापासून सिमेंट व ...

बांधकाम क्षेत्रात उपयुक्त असलेल्या अतिमहत्वाचा घटक म्हणून सिमेंट व लोखंडाचा (स्टिलचा) वापर करण्यात येतो. गेल्या दोन वर्षापासून सिमेंट व लोखंडाच्या (स्टिल) दरात सातत्याने वाढ होत आहे. जीडीपीत वाढ होण्यासाठी व देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये वाढ होण्यासाठी कृषी क्षेत्रानंतर दुसऱ्या क्रमांकाचे बांधकाम क्षेत्र असून देशामध्ये बांधकाम क्षेत्रामुळे दररोज सुमारे सहा कोटी कामगारांना रोजगार उपलबध होतो. सिमेंट व लोखंड (स्टिल) या क्षेत्राचा महत्वाचा घटक आहे. बांधकाम व्यवसायात जो माल वापरल्या जातो त्यांची किंमत सातत्याने वाढत असून बांधकाम क्षेत्रावर याचा विपरीत परिणाम होऊन सर्वसामान्य कामगारांच्या रोजगाराचा प्रश्‍न उद्भवत आहे. मजूरांना रोजगार कमी झाल्याने त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. मागील वर्ष कोरोनामुळे महामारीमुळे अडचणीत गेले. बांधकाम व्यवसायावर अवलंबून असणारा घटक संपूर्णपणे आर्थिक डबघाईस गेला. आजरोजी बांधकाम क्षेत्रात नवीन कायदा लागू होऊन सर्व सामान्यांना परवडणारी घर मिळणार अशी आशा असताना आता सिमेंट व लोखंडाच्या दरवाढीने बांधकाम क्षेत्रात पुन्हा मंदी आली आहे.

दर कमी करण्याची मागणी

सिमेंट आणि लोखंडचे दरवाढ कमी करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन देताना ॲड. सुमित सरदार, सचिव डॉ. प्रकाश अंभोरे, अशोक व्यास, अश्‍विन सातपूते, गोपाल पंडीत, कुमार दलाल, मधुकर जोगदंड, मोरे, अनिल जाधव यादी उपस्थित होते.

अशी झाली दरवाढ

सिमेंट

जानेवारी २०१९ ३६० रुपये बॅग

फेब्रुवारी २०१९ ३९० रुपये बॅग

मे २०२० ४१० रुपये बॅग

डिसेंबर २०२० ४३० रुपये बॅग

लोखंड (टन)

जानेवारी २०१९ ४० हजार रुपये

सप्टेंबर २०२० ४५ हजार रुपये

नोव्हेंबर २०२० ५५ हजार रुपये

डिसेंबर २०२० ५८ हजार रुपये