लग्नाचे आमिष दाखवून डॉक्टरचा नर्सवर बलात्कार

By Admin | Updated: May 1, 2017 01:20 IST2017-05-01T01:20:33+5:302017-05-01T01:20:33+5:30

संग्रामपूर- प्रभारी वैद्यकीय अधिकाºयाने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची तक्रार वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत अधिपरिचारिकेने तामगाव पोलीस स्टेशनला दिली.

Doctor's nurse rape by showing lover of marriage | लग्नाचे आमिष दाखवून डॉक्टरचा नर्सवर बलात्कार

लग्नाचे आमिष दाखवून डॉक्टरचा नर्सवर बलात्कार

संग्रामपूर : लग्नाचे आमिष दाखवून प्रभारी वैद्यकीय अधिकाऱ्याने वेळोवेळी बलात्कार केला; मात्र आता लग्नास नकार देत आहे, अशी तक्रार संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत अधिपरिचारिकेने तामगाव पोलीस स्टेशनला दिल्यावरून प्रभारी वैद्यकीय अधिकाऱ्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
तालुक्यातील वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयाचा वैद्यकीय अधिकारी पदाचा प्रभार जळगाव जामोद येथील डॉ. दीपक कृष्णराव केदार यांच्याकडे आहे. दरम्यान, डॉ. दीपक केदार यांनी लग्नाचे आमिष दाखवित बलात्कार केला. मात्र, आता लग्नास नकार देत आहे, अशी फिर्याद वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका ३४ वर्षीय अधिपरिचारिकेने शनिवारी तामगाव पोलीस स्टेशनला दिली आहे. या फिर्यादीवरून डॉ.दीपक केदार याच्याविरुध्द कलम ३७६ (२) (बी)(एन), ३७६ (सी), ५०६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Doctor's nurse rape by showing lover of marriage