Dnyanganga Wildlife Sanctuary, this year 9 82 exhibited wild animals | ज्ञानगंगा अभयारण्यात यावर्षी ९८२ वन्य प्राण्यांचे दर्शन
ज्ञानगंगा अभयारण्यात यावर्षी ९८२ वन्य प्राण्यांचे दर्शन

- देवेंद्र ठाकरे
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: अकोला वन्य जिव विभागा अंतर्गत येणाºया ज्ञानगंगा अभयारण्यात १८, १९ मे रोजी चंद्रप्रकाशात पर्यटकांनी वन्य प्राण्यांचे दर्शन घेतले. एकूण ५२ पर्यटकांनी निसर्ग अनुभूती घेतली. यावर्षी वन कर्मचाºयांसह पर्यटकांना ९८२ वन्य प्राण्यांचे दर्शन झाल्याचे माहिती देण्यात आली आहे.
यावर्षी अभयारण्यात प्राण्यांसाठी ४० पानवठे तयार करण्यात आले होते. पर्यटकांना बसण्यासाठी ४० मचानांची उभारणी करण्यात आली. या मचानांद्वारे पर्यटक तसेच वन विभागाचे अधिकारी, कर्मचाºयांनी प्राणी बघत निसर्ग अनुभूती घेतली. यावर्षी एकूण ४० मचानांवर ५२ पर्यटकांना प्रवेश देण्यात आला.  प्रत्येक पर्यटकाकडून ६१५ रुपये प्रवेश घेण्यात आली. यातून पर्यटकांना जेवन, नास्ता, चहा, बिस्कीट, ग्लुकोज, थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच पर्यटकांसोबत गाईड देण्यात आला. पर्यटकांना वन विभागाच्या वाहनाद्वारे मचानापर्यंत पोहचविण्याची व्यवस्था करण्यात आली, अशी माहिती संतोष डांगे यांनी दिली. गतवर्षी २०१८ च्या तुलनेत यावर्षी पर्यटकांची संख्या २८ ने वाढलेली दिसून आली. 
दरम्यान यावर्षी अमरावतीचे रेड्डी विभागीय वन अधिकारी खैरनार यांच्या मार्गदर्शनात खामगावचे वन परीक्षेत्र अधिकारी संतोष डांगे, वनपरीक्षेत्र अधिकारी बुलडाणा मयूर सुरवसे, ओवे, अमोल सावंग, निसर्गप्रेमी वनपाल राठोड, वनरक्षक झोटे, कर्मचारी विनकर, जटाले, महारनर, निलावर, पाटील, अमित शेख, संजिवनी पारोडे, कु.ताठे, एन.एस. गोरे आदींच्या उपस्थितीत पर्यटकांनी निसर्ग अनुभव घेतला.

 
असे झाले प्राणी दर्शन!
सन २०१९ या वर्षात पर्यटक आणि वन विभागाच्या निरिक्षणानुसार बिबट-०२,  अस्वल-११, रान डुक्कर-४८८, सांबर २५, बारकिंग डिअर (भेडकी) - ५, स्पोअरटेट डिअर (चितळ) - ५८,  निल गाय - १९९, काळविट - १०८, मोर - ०६, तडस - ०१, माकड - ७९, सायळ - ०६ या प्रमाणे वन्य प्राण्यांचे दर्शन झाले.  सन २०१८ मध्ये १२९ वन्य प्राणी आढळून आले होते. यावर्षी ही संख्या ९८२ पर्यंत पोहचली आहे.


Web Title: Dnyanganga Wildlife Sanctuary, this year 9 82 exhibited wild animals
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.