शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

शहीद जवानांच्या कुटुंबीयांना धनादेशाचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:33 IST

बुलडाणा : पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात पोलीस कवायत मैदानावर ...

बुलडाणा : पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात पोलीस कवायत मैदानावर विविध पुरस्कार, आर्थिक मदतीचे वितरण करण्यात आले. सशस्त्र सेना ध्वजदिन २०१९चे उत्कृष्ट निधी संकलनाबाबत जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांना स्मृतिचिन्ह देण्यात आले. शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वितरण यावेळी करण्यात आले.

यामध्ये मलकापूर येथील शहीद जवान संजयसिंह राजपूत यांच्या आई वीरमाता जिजाबाई भिकमसिंह राजपूत, चोरपांग्रा, ता. लोणार येथील शहीद जवान नितीन राठोड यांच्या वीरपत्नी वंदना राठोड व वीरमाता सावित्रीबाई राठोड यांना प्रत्येकी प्रतिकुटुंब ४० लाख रुपये निधीचे धनादेश प्रदान करण्यात आले. तसेच शहीद जवान अनिल वाघमारे यांच्या वीरपत्नी किरण अनिल वाघमारे यांना ४५ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. शहीद जवान चंद्रकांत भाकरे यांच्या वीरपत्नी मनीषा भाकरे, वीरमाता निर्मलाबाई भाकरे व वीरपिता भगवंतराव भाकरे यांना ४० लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.

जिल्हा पोलीस दलातर्फे नक्षलग्रस्त भागात खडतर व कठीण कर्तव्य बजावल्याबाबत खामगांवचे उपविभागीय पोलीस अधिकारी कोळी यांना विशेष सेवा पदक देण्यात आले. तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये जीव धोक्यात घालून उत्कृष्ट काम केल्याबद्दल आपत्ती निवारण अधिकारी संभाजी पवार, महसूल सहायक किसन जाधव, संजय खुळे, राजेंद्र झाडगे, पो. कॉ. तारासिंग पवार, संतोष वनवे, दीपक वायाळ, रवींद्र गिते, संतोष काकड, होमगार्ड प्रवीण साखरे यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीत आल्याबद्दल खामगांव येथील श्रीमती सरोजबेन दामजीभाई विकमसी ज्ञानपीठाची विद्यार्थिनी तनिष्का रितेश चौधरी हिचा गौरव करण्यात आला. कोविड काळात उत्कृष्ट काम केल्याबद्दल डॉ. मोहम्मद अस्लम व त्यांच्या चमूला प्रशस्तीपत्राचे वितरण करण्यात आले. त्याचप्रमाणे महावितरणच्यावतीने सौर कृषी पंप मिळालेल्या शेतकऱ्यांना डिमांट नोट याप्रसंगी देण्यात आल्या.