शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीसाठी मुंडण करून धरणात आंदोलन

By admin | Updated: April 18, 2017 00:54 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची बियाणे,खते मोफत देण्याची मागणी

मेहकर : दरवर्षी पावसाचे प्रमाण कमी होत आहे. पिकांना भाव नाही, पिकांचे उत्पादन कमी होत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा गंभीर परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, तसेच बियाणे व खते मोफत द्यावे, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पवन गाभणे यांनी देऊळगाव माळी कोराडी धरणामध्ये १७ एप्रिल पासून आंदोलन सुरू केले आहे.सतत पावसाचे प्रमाण कमी होत आहे. दरवर्षी पिकांच्या उत्पादनात घट होत चालली आहे. थोड्याफार प्रमाणात जी काही पिके आली आहेत, त्या पिकांना बाजारात भाव नाही, मातीमोल किमतीने पीक विकावे लागत आहेत, त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. हतबल होऊन कित्येक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांनी विविध राष्ट्रीयीकृत बँकेकडून कर्ज घेतले आहे. पिकांना भाव नाही, पिकांचे उत्पादन नाही, त्यामुळे बँकांचे कर्ज कसे फेडावे, अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. नोटाबंदीमुळेसुद्धा शेतकरी परेशान झाले आहेत. शेतकऱ्यांकडून कर्जाची परतफेड होत नसल्याने विविध बँकांनी शेतकऱ्यांना नोटिस पाठविल्या आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा बिकट परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, तसेच बी-बियाणे, खते मोफत द्यावी, यासाठी देऊळगाव माळी ता.मेहकर येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पवन सुरेश गाभणे यांनी १७ एप्रिलपासून कोराडीच्या धरणात पाण्यात बसून आंदोलन सुरू केले आहे. आश्वासनानंतर आंदोलनाची सांगतास्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पवन सुरेश गाभणे यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व बी-बियाणे, खते मोफत मिळावे, यासाठी कोराडी धरणात आंदोलन सुरु केले होते. दरम्यान, तहसीलदार संतोष काकडे, मंडळ अधिकारी गंगाधर साळुंखे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख डॉ.ज्ञानेश्वर टाले यांनी त्याठिकाणी जावून मागण्या मंजूर करण्याबाबत आश्वासन देऊन आंदोलनाची सांगता केली.