शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव मतदारसंघात रंगतोय चुरशीचा सामना

By admin | Updated: October 9, 2014 00:23 IST

भाजप, काँग्रेस आणि भारिप-बहुजन महासंघामध्येच तिहेरी लढतीचे संकेत.

अनिल गवई / खामगाव खामगाव विधानसभा निवडणुकीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. या मतदारसंघात भाजप, काँग्रेस आणि भारिप-बहुजन महासंघामध्येच तिहेरी लढतीचे संकेत असून, मतदारसंघावर पुन्हा वर्चस्व सिद्ध करण्यासाठी भाजपनेते भाऊसाहेब फुंडकर जिवाचे रान करीत आहेत. त्याचवेळी पकड कायम ठेवण्यासाठी आ. दिलीपकुमार सानंदा यांची धडपड आहे. फुंडकर-सानंदांच्या दुहेरी लढाईत भारिपच्या अशोक सोनोने यांनीही दमदार उडी घेतली. त्यामुळे लढत रंगतदार होणार असल्याचे या म तदारसंघातील चित्र आहे.खामगाव विधानसभा मतदार संघात एकूण ११ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये भारतीय राष्ट्रीय कांग्रेसचे आ. दिलीपकुमार सानंदा, भाजपाचे अँड. आकाश फुंडकर, शिवसेनेचे हरिदास हुरसाड, राष्ट्रवादीचे माजी आमदार नाना कोकरे, भारिप-बहुजन महासंघाचे अशोक सोनोने, यूडीएफ सम िर्थत अपक्ष हाजी बुढन खान, बहुजन मुक्ती पार्टीचे प्रताप तेजराव वानखडे, अखिल भारतीय हिंदू महासभेचे संकेत शेळके पाटील, मायनॉरिटीज डेमोक्रेटिक पार्टीचे मो. हसन अ. खालीक तसेच अ पक्ष शे. इरफान शेख सुभान कुरेशी, श्याम बन्सीलाल शर्मा यांचा समावेश आहे. सानंदा यांनी तीन वेळा विजय संपादन केला. त्यामुळे या मतदारसंघात त्यांचा एकछत्री अंमल आहे. मात्र, या निवडणुकीत खामगाव मतदारसंघावर पुन्हा ताबा मिळविण्यासाठी आ. भाऊसाहेब फुंडकर यांनी कंबर कसली आहे. या मतदारसंघात भाजपा आणि काँग्रेस या प्रमुख राजकीय पक्षांमध्ये लढ तीचे चित्र असले तरी भारिपच्या अशोक सोनोने यांनी आपली दावेदारी प्रबळ केली आहे. त्यामुळे काँग्रेस, भाजप आणि भारिप अशी तिहेरी लढतीचे चित्र आहे. याशिवाय राष्ट्रवादीचे नाना कोकरे हेसुद्धा यावेळी नशीब आजमावत असून, यूडीएफ सर्मथित अपक्ष उमेदवार हाजी बुढन खान पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे मुस्लिम समाजाच्या मतांचे विभाजन अटळ असल्याने त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. भाजप, सेना युतीत काडीमोड झाल्याने राज्यातील सर्वच मतदारसंघांमध्ये भाजप, सेनेचे उमेदवार परस्परांसमोर उभे ठाकले आहेत. अनेक मतदारसंघात या उमेदवारांमध्ये खटकेदेखील उडत आहेत.