शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

दहा रुपयांचे नाणे घेण्यास व्यापाऱ्यांचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2017 00:07 IST

अफवेमुळे नागरिक त्रस्त : नाणे स्वीकारण्यास व्यावसायिकांकडून नकार

मोताळा: दहा रुपयांचे नाणे बंद झाल्याच्या अफवांमुळे नागरिकांसह व्यावसायिक त्रस्त झाले असून, बऱ्याच ठिकाणी नागरिकांकडून नाणे स्वीकारले जात नसल्याने जमा झालेल्या नाण्यांचे काय करावे, असा प्रश्न नागरिकांसह व्यावसायिकांसमोर पडला आहे.दहा रुपयांचे नाणे व्यवहारातून बंद झाले नाही, हे वारंवार सांगितल्यावरही नाणी बंद झाल्याच्या अफवांवर विश्वास ठेवून नागरिक कुणाकडूनही घेत नाही, तसेच व्यावसायिकांनी घेतल्यावर ग्राहक त्यांच्याकडून स्वीकारत नाही. या प्रकारामुळे सुज्ञ नागरिक व व्यावसायिक चांगलेच अडचणीत आले आहेत. मागील काही दिवसांपासून दहा रुपयांचे नाणे बंद झाल्याची अफवा सुरू आहे. ग्रामीण भागासह मोताळा शहरातही हा प्रकार दिसून येत असून, बाजारात, बँकांमध्ये, पोस्ट आॅफिस आदी ठिकाणी दहा रुपयांची नाणी स्वीकारत नसल्याची बाब समोर आली. मोताळा स्वस्तिक जनरल स्टोअर्सचे मालक वीज बिल भरण्यासाठी पोस्टात गेल्यावर त्यांच्याकडून दहा रुपयांची नाणी स्वीकारली गेली नाही. याबाबत पोस्ट मास्टर सुपे यांच्याशी विचारणा केली असता, पोस्ट आॅफिसमध्ये अगोदरच ग्राहकांकडून नऊ हजार रुपयांची स्वीकारलेली दहाची नाणी जमा आहे. ग्राहक आमच्याकडून ही नाणी घेत नाही. शिवाय बँकेकडूनही प्रतिसाद मिळाला नाही. पोस्ट आॅफिसची पैशांची जमा करण्याची मर्यादा २० हजार असल्यामुळे आम्ही अडचणीत आहोत. ग्राहकांनी पोस्ट आॅफिसमधील दहा रुपयांची नाणी स्वीकारली तर व्यवहार खोळंबणार नाही आणि आमची अडचणही दूर होईल. येथील स्टेट बँकेच्या शाखाधिकाऱ्याला दहा रुपयांची नाणी बंद झाली का? तुम्ही दहा रुपयांची नाणी का स्वीकारत नाही? असे विचारले असता, दहा रुपयांची नाणी बंद झाली नसून, ग्राहकांनी अफवांवर विश्वास न ठेवता व्यवहारामध्ये देवाण-घेवाण करावी. बँकेच्या काऊंटरवर मोठ्या प्रमाणात दहा रुपयांची नाणी आणल्यास मोजण्यास वेळ लागून बँकेच्या व्यवहारावर त्याचा परिणाम होतो. येथील पोस्ट आॅफिसचे आमच्या बँकेत खाते नाही; मात्र दहा रुपयांच्या शंभर नाण्यांची पिशवी करून आणल्यास पैसे स्वीकारणे सोयीचे होईल. असे असले तरी मागील काही दिवसांपासून मोताळा परिसरात दहा रुपयांची नाणी स्वीकारत नसल्याने सर्वच अडचणीत आले आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक नागरिकांसह छोटे-मोठे व्यावसायिक, फेरीवाले, आठवडी बाजारातील किरकोळ व्यापाऱ्यांनी दहा रुपयांची नाणी ग्राहकांकडून स्वीकारली आहेत; मात्र अलिकडे आता ग्राहक त्यांच्याकडून दहा रुपयांची नाणी स्वीकारत नाही. त्यामुळे अनेकांकडे हजारो रुपयांची दहा रुपयांची नाणी जमा झालेली आहे. यासाठी व्यापक स्वरूपात जनजागृतीची गरज असून, बँकांनीही सहकार्य करावे, अशी नागरिकांची मागणी आहे. १० रुपयांची नाणी चलनातून बाद झालेली नाही. नागरिकांनी दहा रुपयांची नाणी व्यवहारात वापरावी. लहान-मोठे व्यवहार सहज व्हावे, यासाठीच नाणी असून, नागरिकांनीही निश्चिंत होऊन व्यवहारात नाण्यांची देवाण-घेवाण करावी. दहा रुपयांची नाणी बंद झाल्याच्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे बँकेने स्पष्ट केले आहे.दहा रूपयांचे नाणे बंद झाले नसून, बंद झाल्याच्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. दहा रूपयांचे नाणे न स्वीकारणाऱ्यावर कलम १२४ (अ) नुसार देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो.- अजय अ‍ेडगावकर, शाखाधिकारी, स्टेट बँक, मोताळा