शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

देव्हारीचे पुनर्वसन रखडले

By admin | Updated: October 2, 2015 02:18 IST

निधीची तरतूद झाल्याशिवाय पुनर्वसन शक्य नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्टीकरण; पुनर्वसनास ३0 कोटींचा निधी लागणार.

सिद्धार्थ आराख / बुलडाणा : राज्यातील राष्ट्रीय उद्यान व अभयारण्याच्या अंतर्गत क्षेत्रातील गावांचे त्याच्याबाहेर पुनर्वसन करण्याकरिता तत्कालीन आघाडी सरकारने १0 कोटी ७५ लाख रुपयांची भरीव तरतूद केली होती. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यातील देव्हारी गावाचा समावेश होता. तथापि, देव्हारी येथील गावकर्‍यांनी जमिनीच्या मोबदल्यात जमीन देण्याची मागणी लावून धरल्यामुळे आणि शासनाजवळ ३६0 एकर एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर जमीन उपलब्ध होऊ शकत नसल्यामुळे पुनर्वसन लांबणीवर गेले आहे. दरम्यान, देव्हारी गावाच्या पुनर्वसनासाठी ३0 कोटी रुपयांचा निधी लागणार असून, निधीची तरतूद झाल्याशिवाय पुनर्वसन होऊ शकत नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव, बुलडाणा, चिखली व मोताळा तालुक्यात ज्ञानगंगा अभयारण्य पसरले आहे. समृद्ध वनसंपदा व वन्यजिवांचे आश्रयस्थान असलेल्या हे जंगल १९९७ साली अभयारण्य घोषित झाले. याच अभयारण्यातून बुलडाणा-बोथा- खामगाव हा राज्य मार्ग गेला आहे. अभयारण्य घोषित झाल्यानंतर या जंगलाच्या मध्यभागी असलेल्या देव्हारी, बोराळासह खामगाव तालुक्यातील माटरगाव, बोथा, गेरू, कोंटी, गोंधनखेड या सात गावांच्या पुनर्वसनाच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. यामध्ये प्रामुख्याने देव्हारी हे गाव जंगलाच्या मध्यभागी असल्यामुळे त्याचे पुनर्वसन प्राधान्याने करण्याचे शासनाने ठरविले होते. त्यासाठी वन विभाग व वन्यजीव विभागाने वेळोवेळी देव्हारी गावात जाऊन ग्रामस्थांची बैठक घेत तशा सूचना केल्या होत्या. पुनर्वसनाच्या मोबदल्यात गावकर्‍यांच्या नेमक्या कोणत्या मागण्या आहेत, यावर चर्चा करून तसा अहवाल एकदा नव्हे, तर अनेकदा शासनाकडे पाठविला होता. गावकर्‍यांनी २२ एप्रिल २0१३ ला ग्रामपंचायतीचा ठराव आणि शेतीचे सात-बारा शासनाकडे पाठविले आहेत. विशेष म्हणजे, तत्कालीन आघाडी सरकारने अर्थसंकल्पामध्ये राष्ट्रीय उद्यान व अभयारण्य क्षेत्रासाठी १0 कोटी ७५ लाख रुपये एवढी भरीव तरतूदसुद्धा करून दिली होती. तरी देखील देव्हारी गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न मागील १८ वर्षांपासून प्रलंबित आहे. रात्री १0 ते सकाळी ६ वाजेपर्यंत हा मार्ग रहदारीला बंद करण्यात आल्याने गावकर्‍यांच्या समस्येत वाढ झाली आहे.