शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
3
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
4
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
5
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
6
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
7
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
8
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
9
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
10
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
11
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
12
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
13
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
14
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
15
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
16
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
17
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
18
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
19
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
20
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
Daily Top 2Weekly Top 5

निर्णयांचा ‘एकनाथी पॅटर्न’ !

By admin | Updated: January 11, 2015 00:17 IST

दिवसभर एकाच हॉलमध्ये सर्व बैठका घेऊन तत्काळ निर्णय घेण्याचा ‘एकनाथी पॅटर्न’

राजेश शेगोकार /बुलडाणापालकमंत्री कमी अन् झेंडा मंत्री जास्त अशीच स्थिती कमी-अधिक फरकाने बुलडाण्याची राहिली आहे. महसूलसारखे दमदार खाते, मुख्यमंत्र्यांच्या बरोबरीचा मान असलेल्या एकनाथ खडसे यांच्याकडे प्रथमच बुलडाणा जिल्ह्याचे पालकत्व आले आहे. पहिल्याच बैठकीसाठी जिल्ह्यात दाखल झालेल्या खडसे यांनी मुक्काम ठोकून अनेक प्रश्नांवर तत्काळ मार्ग काढला. त्यांनी घेतलेल्या मॅराथॉन बैठकांमुळे अधिकारीही प्रभावित झाले असून, या प्रत्येक निर्णयावर त्यांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून आला. दिवसभर एकाच हॉलमध्ये सर्व बैठका घेऊन तत्काळ निर्णय घेण्याचा त्यांचा हा ह्यएकनाथी पॅटर्नह्ण सध्या जिल्ह्यात चर्चेचा आहे.मलकापूर येथे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश यांचे न्यायालय महिन्यातून १५ दिवस सुरू करण्याबाबत विधी व न्याय खात्याकडे प्रलंबित असलेल्या प्रस्तावाचा तत्काळ निपटारा केला. थेट संबंधित खात्याच्या सचिवांनाच दूरध्वनी करून मी घोषणा करू का, असा प्रश्न विचारून या न्यायालयालाही हिरवा कंदील मिळवला. असे अनेक निर्णय तडकाफडकी घेतले. नियोजन सभेत जिल्हा परिषद सदस्यांनाही धारेवर धरण्यास कमी केले नाही व अधिकार्‍यांनाही फटकारण्यास मागे-पुढे पाहिले नाही. पालकमंत्री म्हणून त्यांनी सुरुवात छान केली. नागरिकांसोबतच अधिकारीही प्रभावित झाले; मात्र आता अपेक्षांची कमान वाढती राहील. नियोजन सभेत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी, शासनस्तरावर त्याचा होणारा पाठपुरावा याची सर्वच जबाबदारी त्यांच्यावर येऊन ठेपली आहे. जिगाव प्रकल्पांतर्गत भूसंपादनाचा झालेला निवाडा वादग्रस्त ठरला आहे. खुरकुंडी, टाकळी वतपाळ, पातोंडा आदी गावातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. खडकपूर्णा प्रकल्पाचे काम अपूर्ण आहे. सिंदखेडराजा विकास आराखडा, लोणार सरोवर परिसराला विकसित करून हेरिटेजचा दर्जा, खामगाव जालना रेल्वे मार्गाचा प्रश्न, साखरखेर्डा, लाखनवाडा तालुक्यासह खामगाव जिल्ह्याची मागणी अशा अनेक प्रश्नांवर त्यांची कसोटी लागणार आहे. मंत्रिमंडळातील त्यांचे स्थान पाहता जिल्ह्याच्या अपेक्षा चुकीच्याही नाहीत. उद्या यदाकदाचित मंत्रिमंडळ विस्तारात जिल्ह्याला मंत्रिपद मिळाले तरी त्यांच्यावरील अपेक्षांचे ओझे कमी होणार नाहीच, त्यामुळे त्यांच्या ह्यएकनाथीह्ण बैठकांचा पॅटर्नचे सातत्य जिल्ह्यातील रखडलेल्या प्रश्नांवरही कायम राहणे गरजचे आहे, असा पॅटर्न केवळ ह्यआरंभशूरह्ण ठरू नये इतकेच!