शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा मुदतवाढ ठरणार ‘फार्स’

By admin | Updated: August 3, 2015 01:35 IST

ग्राम पंचायत निवडणुकीत कर्मचारी व्यस्त असल्याने मुदतवाढीचा उपयोग शुन्य.

सुहास वाघमारे / नांदुरा (जि. बुलडाणा): शासनाने १ ऑगस्टच्या संध्याकाळी परिपत्रक काढून ७ ऑगस्ट पर्यंत पिक विम्याला मुदतवाढ दिली. मात्र २ ऑगस्टचा रविवार असून सोमवार तीन ऑगस्टपासून सहा ऑगस्टपर्यंंत कर्मचारी ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रक्रीयेत राहणार आहेत. त्यामुळे कर्मचार्‍यांना शेतकर्‍यांना उपलब्ध होवून प्रमाणपत्र देणे शक्य नाही. सदर मुदतवाढ फार्स ठरणार असल्याची चर्चा आहे. तथापि, शासनाने ३१ ऑगस्ट पर्यंत पिक विम्याची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी होत आहे.यावर्षी सुरवातीला जोरदार बरसणार्‍या पावसाने दडी मारल्याने काही भागात दुबार पेरणीचे संकट शेतकर्‍यांवर ओढवले व काहीच्या तर अद्यापही पेरण्याच बाकी आहेत. त्यामुळे पिक विमा काढण्याची ३१ जुलैची मुदत झाल्यानंतरही शेतकरी पिक विमा काढूच शकले नाही. त्यामुळे पिक विम्याची मुदत वाढवून देण्याची मागणी शेतकर्‍यांची होती. आधी नकाराची भाषा बोलणार्‍या राज्य शासनाने १ ऑगस्टच्या संध्याकाळी कृषी विभागाचे अवर सचिव श.बा.पावसकर यांनी परिपत्रक काढून ७ ऑगस्ट पर्यंंत मुदत वाढ दिली आहे. या परिपत्रकात ज्या अटी दिल्या आहेत. त्यामध्ये मुद्दा क्रमांक एक नुसार पेरणी हि १ ते ७ ऑगस्ट दरम्यानचीच असल्यास सदर मुदतवाढ लागु होणार आहे.प्रत्यक्षात मागील आठ दिवसांपासून पेरण्या खोळंबल्याने कोणीही या कालावधीत पेरणी करने शक्य नाही. मुद्दा क्रमांक दोन नुसार शेतकर्‍यांनी पिक विमा प्रस्तावावर पिकाची स्थिती सर्वसाधरणपणे चांगली असल्याची करणे आवश्यक आहे. हे सुध्दा पेरण्या खोळंबल्याने शक्य नाही. मुद्दा क्रमांक तीन नुसार शेतकर्‍यांना सक्षम प्राधिकार्‍याचे प्रमाणपत्र म्हणजेच तलाठी व कृषी अधिकारी यांचे प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक असून बॅकांनी ते सांभाळून ठेवण्याची सुचना आहे. पावसाने दडी मारल्याने व दुबार पेरणीचे संकट शेतकर्‍यांवर ओढावले आहे. काही भागात आजही पेरण्या बाकी अशा परिस्थितीत राज्य शासनाने कर्जमाफी व दुबार पेरणीसाठी मदत देण्याची मागणी शेतकर्‍यांची होती; मात्र शासनाने शेतकर्‍यांना 'भोपळा' दिला.