शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

नवीन उपविभागाची निर्मिती करावी!

By admin | Updated: May 1, 2017 00:59 IST

श्वेता महाले यांची ऊर्जा मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी

चिखली : लव्हाळा येथे १३२/३३ के.व्ही. उपकेंद्राची निर्मिती करण्यात यावी, तसेच चिखली उपविभागाचे विभाजन करून नवीन उपविभागाच्या निर्मितीसह पेठ व चिखली-२ शाखा कार्यालयाची सुद्धा निर्मिती करण्याची मागणी जि.प. महिला व बालकल्याण सभापती श्वेता महाले पाटील यांनी ऊर्जा मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. बुलडाणा विभागांतर्गत चिखली उपविभागीय कार्यालय आहे. या विभागामध्ये ३३/११ के.व्ही. चे ४ उपकेंद्र आहेत, तर नवीन २ उपकेंद्र मंजूर आहेत व नवीन ४ उपकेंद्र प्रस्तावित आहेत. ११ के.व्ही.च्या एकूण ४६ वीज वाहिन्या आहेत. त्यातील २४ स्वतंत्र कृषी वीज वाहिन्या आहेत. या विभागात जवळपास १ हजार ७०० रोहित्र आहेत. तसेच उच्चदाब व मंजूर वाहिन्यांचे ४००० कि.मी.चे जाळे चिखली तालुक्यात पसरलेले असून, ग्राहक संख्या ६१ हजारांच्या वर आहे. १५०० च्यावर कृषी पंप ग्राहकांचे कामे सुरू असून, त्यामुळे ग्राहक संख्येत भर पडणार आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भार पडत असल्याने ग्राहकांना सेवा देण्यात अडथळा येत आहे. बुलडाणा जिल्हात चिखली सर्वात मोठा तालुका आहे. त्यामुळे चिखली उपविभाग तसेच चिखली शहर शाखा कार्यालयाचे विभाजन करून उन्द्री उपविभागची आणि नवीन पेठ व चिखली- २ शाखा या कार्यालयाची निर्मिती करणे गरजेचे असून, त्यामुळे वीज वाहिनी देखभाल व दुरुस्तीची कामे क्षेत्रीय आणि बिलिंगच्या कामावर नियंत्रण ठेवता येईल. लव्हाळा येथे १३२/३३ के.व्ही सबस्टेशन उभारल्याने चिखली तालुक्यातील जवळपास ६७ गावांना व ०२-३३/११ के.व्ही सबस्टेशनला वीज पुरवठा सुरळीत होईल व शासनाच्या धोरणाप्रमाणे शेतकऱ्यांना अखंडित सुरळीत वीज पुरवठा देणे शक्य होणार आहे. तसेच लव्हाळा येथे १३२ के.व्ही उपकेंद्र झाल्यास चिखली तालुका व मेहकर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. चिखली २२० के.व्ही सबस्टेशनमधून निघणाऱ्या दुसरबिड व एकलारा ३३ के.व्ही. वाहिनीवर सिजनमध्ये ओव्हरलोड येत असल्याने शेतकऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत मिळत नाही. चिखली शहरात सद्यस्थितीत १३ हजार ६०० वीज ग्राहक असून, एकच वितरण कार्यालय अस्तित्वात आहे. या ग्राहक संख्येनुसार दोन वितरण केंद्राची आवश्यकता आहे. जेणेकरून ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण व ग्राहक सेवा तत्पर देणे शक्य होईल. चिखली उपविभागीय केंद्रामध्ये ३३/११ के.व्ही.चे ९ उपकेंद्र आहेत. नवीन २ उपकेंद्र मंजूर आहेत, तर ४ उपकेंद्र प्रस्तावित आहेत; परंतु या सर्व केंद्रांना पुरवठा करणार २२०/१३२ के.व्ही.चे उपकेंद्र चिखली येथे आहे. त्या उपकेंद्रावर ३३/११ के.व्ही उपकेंद्राना पुरवठा करणाऱ्या अतिभारी आहेत. त्यामुळे नवीन मंजूर तसेच नवीन प्रस्तावित ३३/११ के.व्ही उपकेंद्राना पुरवठा करणाऱ्या वाहिन्या व त्याची क्षमता अपुरी पडत आहे. हीच स्थिती कायम राहिल्यास येत्या काळात विजेची समस्य उग्र रूप धारण करू शकते. त्यामुळे लव्हाळा येथे १३२/३३ के.व्ही. उपकेंद्रांची निर्मिती करण्यात यावी व चिखली उपविभागचे विभाजन करून नवीन उपविभागाच्या निर्मितीसह पेठ व चिखली-२ शाखा कार्यालयाची सुध्दा निर्मिती करण्याची मागणी जि.प.महिला व बालकल्याण सभापती श्वेता महाले पाटील यांनी ऊर्जा मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे जिल्हा दौऱ्यादरम्यान केली. दरम्यान ना. बावनकुळे यांनी या निवेदनाची दखल घेत सदर उपकेंद्राचे प्रस्ताव मंजुरीकरिता पाठविण्याचे सांगितले आहे.