शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

कोविड केअर सेंटरला मिळाले ४० ऑक्सिजन सिलिंडर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:34 IST

चिखली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता बुलडाणा येथे शिवशाही कोविड केअर सेंटरची सुरूवात करण्यात आली आहे. मात्र, येथे उपचार ...

चिखली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता बुलडाणा येथे शिवशाही कोविड केअर सेंटरची सुरूवात करण्यात आली आहे. मात्र, येथे उपचार घेणाऱ्या रूग्णांसाठी ऑक्सिजनचा तुटवडा असल्याची बाब समजताच आमदार श्वेता महाले यांनी पुढाकार घेत ४० ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून दिले आहेत.

कोविड महामारीच्या काळात नागरिकांना दिलासा मिळाला यासाठी प्रा. डी. एस. लहाने यांनी बुलडाणा येथे शिवशाही कॉन्व्हेंटची इमारत कोविड केअर सेंटरसाठी दिली आहे. यामध्ये कोविड रूग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र, ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. दरम्यान काही दिवसांपूर्वी आ. श्वेता महाले यांनी इतर जिल्ह्यातील ऑक्सिजन प्लांट व्यवस्थापन सोबत बोलून चिखली व बुलडाणा शहरातील खासगी रूग्णालयांना लागणारा ऑक्सिजन देण्याची विनंती केली होती. त्याप्रमाणे शिवशाही कोविड केअर सेंटला ऑक्सिजन मिळवून देण्याची विनंती प्रा. लहाने केली असता आ. महालेंनी तातडीने ऑक्सिजन प्लांट व्यवस्थापनाशी बोलून ऑक्सिजन मिळवून दिला आहे. आ. महालेंच्या पुढाकाराने चिखली शहरात मागील पाच दिवसात १२० तर बुलडाणा शहरात ९० असे २१० ऑक्सिजन सिलिंडर मिळाले आहेत. २४ एप्रिलला ४० ऑक्सिजन सिलिंडरची खेप शिवशाही कोविड सेंटर पोहचल्यानंतर शिवशाही प्रा. लहाने आ. महाले यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी बुलडाणा भाजपा तालुकाध्यक्ष अ‍ॅड. सुनील देशमुख, विनायक भाग्यवंत, नगरसेवक मंदार बाहेकर, चंद्रकांत काटकर, दीपक शेळके, सय्यद आसिफ, आदींची उपस्थिती होती.

ऑक्सिजनची मागणीच नसल्याने तुटवडा !

जिल्ह्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकतेप्रमाणे जिल्हा प्रशासनाकडून मागणीच नसल्याने जिल्ह्यात ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असल्याचे आ. श्वेता महाले यांनी स्पष्ट केले आहे़ जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयात लागणाऱ्या ऑक्सिजनच्या मागणी प्रमाणे नोंदणी करून पुरवठा करण्याची मागणी जिल्हाधिकारी बुलडाणा, आयुक्त अमरावती आणि अकोला, बुलडाणा वाशिम जिल्ह्यासाठी कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपायोजनांसाठी नेमलेले समन्वयक भारतीय प्रशासन सेवेतील आश्विन मुदगल यांच्याकडे केला आहे.

खासगी रुग्णालयांनाही ऑक्सिजन द्या !

जिल्ह्यातील अनेक खासगी रुग्णालयांना कोरोना उपचारासाठी परवानगी दिलेली आहे. परंतु यातील काही दवाखाने अनोंदणीकृत असतानाही कोरोनाचा उपचार करीत आहेत. मात्र, या अनोंदणीकृत दवाखान्यातील रुग्ण व डॉक्टरांना रेमडिसिवीर व ऑक्सिजनच्या कमतरतेचा फटका बसत आहे. त्यांना सुद्धा ऑक्सिजनची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे अनोंदणीकृत खासगी रुग्णालयांकडून तातडीने प्रस्ताव मागवून त्यांना कोरोनावर उपचार करण्याची परवानगी द्यावी, असे पत्र देखील आ. महाले यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.