शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
3
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
4
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
5
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
6
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
7
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
8
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
9
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
10
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
11
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
12
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
13
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
14
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
15
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
16
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
17
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
18
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
19
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
20
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Buldhana : रुग्ण दोन हजाराच्या उंबरठ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 10:55 IST

रविवारी ६७ जण कोरोना बाधीत आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या ही १,९०७ झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यातील कोराना बाधीतांची संख्या दोन हजारांच्या टप्प्यात आली असून रविवारी ६७ जण कोरोना बाधीत आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या ही १,९०७ झाली आहे. दरम्यान गेल्या २४ दिवसात प्रतिदिन सरासरी ५२ रुग्ण रुग्ण जिल्ह्यात आढळून येत असून या २४ दिवसात जिल्ह्यात १,२३८ बाधीत रुग्ण आढळून आले.परिणामी जुलै, आॅगस्ट महिन्यात कोरोना संसर्गाची व्याप्ती जिल्ह्यात वाढली आहे. आतापर्यंत २०० पेक्षा अधिक प्रतिबंधीत क्षेत्रातील दोन लाख लोकसंख्येपैकी १३ हजार संदिग्ध रुग्णांचे स्वॅब आतापर्यंत तपासण्यात आले आहे.दुसरीकडे प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेले व रॅपीड टेस्टमध्ये तपासणी करण्यात आलेल्या ३९७ जणांच्या अहवालापैकी ३३० जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर ६७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये चिखलीतील तीन, सातगाव म्हसला येथील दोन, मलकापूर येथील तीन, मोताळा येथील एक, गोतमारा दोन, लोणार चार, दहीफळ एक, बानापूर दोन, खळेगाव दोन, सुलतानपूर चार, नांदुरा चार, भालेगाव बाजार एक, जयपूर लांडे एक, खामगाव १९, देऊळगाव राजा तीन, बायगाव चार, मेहकर पाच, आडोळ एक, पळसकेड एक, बुलडाणा दोन, शेगाव दोन, सिंदखेड राजातील शेलू येथे एक जण पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, ३५ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. यात मेहकरमधील दहा, डोणगाव दोन, घाटबोरी एक, खामगावात २१ आणि येळगाव येथील एका रुग्णास सुटी देण्यात आली आहे.दुसरीकडे तपासणी करण्यात आलेल्या संदिग्ध १२,३२० रुग्णांचे अहवाल निगेटीव्ह आलेले आहे तर बाधीत झालेल्या रुग्णांपैकी एक हजार १६० जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सध्या १७१ जणांच्या अहवालांची प्रतीक्षा आहे. रुग्णालयामध्ये सध्या ७१२ अ‍ॅक्टीवर रुग्णांवर उपचार करण्यात येत ्सून कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या ३५ असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांनी दिली. दुसरीकडे जिल्ह्यात कोरोना संसर्गाची व्याप्ती वाढत असून रुग्ण संख्या दोन हजाराच्या उंबरठ्यावर येवून ठेपली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या