Corona Cases in Buldhana : चौघांचा मृत्यू, १८० जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 11:06 IST2021-06-05T11:06:40+5:302021-06-05T11:06:48+5:30

Corona Cases in Buldhana: ४ हजार ११५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

Corona Cases in Buldhana: Four killed, 180 positive | Corona Cases in Buldhana : चौघांचा मृत्यू, १८० जण पॉझिटिव्ह

Corona Cases in Buldhana : चौघांचा मृत्यू, १८० जण पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: कोरोनामुळे शुक्रवारी जिल्ह्यात चौघांचा मृत्यू झाला असून, १८० जण तपासणीत कोरोनाबाधित आढळून आले. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी एकूण ४ हजार २९५ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ४ हजार ११५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यातील ४०, खामगाव १८, शेगाव १७, देऊळगाव राजा २८, चिखली ९, मेहकर १०, मलकापूर ६, नांदुरा १०, लोणार १३, मोताळा ५, जळगाव जामोद ११, सिंदखेड राजा ८ आणि संग्रामपूर तालुक्यातील ५ जणांचा यामध्ये समावेश आहे. उपचारादरम्यान मलकापूर येथील ४४ वर्षीय व्यक्ती, खामगावमधील ४४ वर्षीय व्यक्ती, मेहकरातील उटी येथील ७० वर्षीय पुरुष, सिं. राजातील शेंदुर्जन येथील ४० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे २८९ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली.

Web Title: Corona Cases in Buldhana: Four killed, 180 positive