चिखलीतील शिवाजी विद्यालयातून संगणक लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:25 IST2021-06-05T04:25:33+5:302021-06-05T04:25:33+5:30

राज्यातील इतर शाळा, महाविद्यालयांप्रमाणे स्थानिक श्री शिवाजी विद्यालयदेखील सध्या बंद आहे. २ जूनच्या सकाळी कॉम्प्युटर ऑपरेटर उमेश थोरात विद्यालयात ...

Computer Lampas from Shivaji Vidyalaya in Chikhali | चिखलीतील शिवाजी विद्यालयातून संगणक लंपास

चिखलीतील शिवाजी विद्यालयातून संगणक लंपास

राज्यातील इतर शाळा, महाविद्यालयांप्रमाणे स्थानिक श्री शिवाजी विद्यालयदेखील सध्या बंद आहे. २ जूनच्या सकाळी कॉम्प्युटर ऑपरेटर उमेश थोरात विद्यालयात गेले असता, लॅबची मागील खिडकी तोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी पाहणी केली असता आतील संगणक व काही साहित्य लंपास केले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याची माहिती त्यांनी प्राचार्य कृष्ण वामन पाटील यांना दिली. पाहणीदरम्यान लॅबमधील ३ सीपीयू, दहा मॉनिटर, ९ की-बोर्ड, ९ माऊस, १ प्रोजेक्टर, १ डीलिंक हब, १० पॉवर केबल, १० व्हीजे केबल असे सुमारे ४० हजार रुपये किमतीचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी पाटील यांच्या तक्रारीवरून चिखली पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल शशिकांत धारकरी, रणजित हिवाळे हे करीत आहेत.

Web Title: Computer Lampas from Shivaji Vidyalaya in Chikhali