शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’३४ जुगा-यांवर गुन्हा दाखल

By admin | Updated: October 29, 2014 00:13 IST

मलकापूर येथील प्रतिष्ठितांचा समावेश.

खामगाव (बुलडाणा) : राष्ट्रीय महामार्गावर पिकनिक हॉटेल जवळ सुरु असलेल्या जुगार अड्डय़ावर काल २७ ऑक्टोबरला उपविभागीय पोलिस अधीकारी जी. श्रीधर यांच्या पथकाने छापा मारुन जुगार्‍यांना ताब्यात घेतले होते. तर कालच रात्री या ३२ जुगार्‍यांवर मलकापूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये राजकीय पदाधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांचासुद्धा समावेश आहे.मलकापूर शहरानजीक हॉटेल पिकनिकचे बाजूला असलेल्या बंद खोलीमध्ये खुलेआमपणे जुगाराचा अड्डा असल्याची माहिती खामगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी जी. श्रीधर यांना मिळाली होती. त्याआधारे उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांच्या पथकाने काल २७ ऑक्टोबर रोजी रात्री या जुगाराच्या अड्डय़ावर छापा मारला असता ३४ जण जुगार खेळताना आढळून आले होते. या जुगार्‍यांकडून पथकाने नगदी १ लाख १५ हजार ४९0 रुपये, १३ दुचाकी, इंडिका व स्वीफ्ट डिझायनर अशा दोन कार असा एकूण ८ लाख ७८ हजार ४९0 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता; तसेच जुगार खेळणार्‍या ३४ जणांना ताब्यात घेण्यात आले होते. याप्रकरणी रात्री मलकापूर पो.स्टे.ला या ३४ जुगार्‍यांविरुद्ध कलम ४ व ५ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये माजी नगराध्यक्ष दिलीप त्र्यंबकराव देशमुख, नगरसेवक प्रमोद विश्‍वनाथ अवसरमोल, शंकर विष्णू वाघ, रितेश कैलास वाघ, हरिदास तुकाराम पाटील यांच्यासह ३२ आरोपींचा समावेश आहे.