देऊळगावराजा : नगर पालिकेने सफाई कामगारांना तीन महिन्यांचे वेतन न दिल्याने त्यांनी बुधवारपासून काम बंद करून गुरुवारी झाडू मोर्चा काढला. शुक्रवारी सफाई कामगार शहरात भीक मांगो आंदोलन करणार आहेत. नगरपालिका प्रशासनाच्या उदासीन कारभारामुळे हे आंदोलन चर्चेचा विषय बनला आहे. न.प.मध्ये कार्यरत असलेल्या ३८ सफाई कामगारांना फेब्रुवारी महिन्यापासून वेतन नाही. सेवानवृत्ती वेतनही प्रलंबित आहे. सहाव्या वेतन आयोगाची थकबाकीही २00६ पासून प्रलंबित आहे. शासन नियमानुसार सफाई कामगारांना आठ वर्षांपासून सवल तीचा मिळणारा लाभही प्रशासनाने रोखून धरला आहे. बुधवारपासून शहरातली साफसफाई बंद आहे. हा झाडू मोर्चाने शहरात चर्चेचा विषय सुरू झाला. शुक्रवारी न.प.चे हे सफाई कामगार भीक मांगो आंदोलन करणार आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}