शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

शहरात लसीकरण अभियान वाॅर्डनिहाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:35 IST

सिंदखेडराजा : शहरात लसीकरण मोहीम राबवून शहर कोविडमुक्त करण्याचा निर्णय झाला आहे. यासाठी पालिकेने तयारी पूर्ण केली आहे. शहराची ...

सिंदखेडराजा : शहरात लसीकरण मोहीम राबवून शहर कोविडमुक्त करण्याचा निर्णय झाला आहे. यासाठी पालिकेने तयारी पूर्ण केली आहे.

शहराची लोकसंख्या २० हजार आहे. यातील ४५ वर्षे वयोगटापासून लसीकरण करण्याची मुभा केंद्र सरकारने नुकतीच दिली आहे. त्यानुसार शहरातील वरील वयोगटातील व्यक्तींना लस देण्यासाठी पालिकेने नियोजन केले असून बुधवारी यासंदर्भात पालिका सभागृहात बैठक पार पडली..

विभागीय अधिकारी सुभाष दळवी, तहसीलदार सुनील सावंत, नगराध्यक्ष सतीश तायडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनीता बिराजदार, मुख्याधिकरी प्रशांत व्हतकर, सर्व नगरसेवक, पालिका कर्मचारी व प्रत्यक्ष लसीकरण जनजागृती मोहिमेत सहभाग घेणारे पालिकेचे शिक्षक यावेळी उपस्थित होते. दर दिवशी २०० लाभार्थी नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. एका महिन्यात लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. उपस्थित अधिकारी, नगराध्यक्ष यांनी या संपूर्ण मोहिमेचा आढावा घेतला. सर्व्हे करणाऱ्या शिक्षकांना उपयुक्त सूचना केल्या. उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांच्याकडूनही आजच्या बैठकीत सूचना मागविण्यात आल्या आहेत. या लसीकरण मोहिमेत कोणतीच अडचण येणार नाही यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत.

नागरिकांनीही या मोहिमेला प्रतिसाद देऊन उपरोक्त वयोगटातील नागरिकांनी लस घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.