शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

चिखली अर्बनचे अध्यक्ष सतीष गुप्त यांच्यावर जीवघेण्या हल्ला

By admin | Updated: April 30, 2017 19:35 IST

चिखली- चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त यांच्या कार वर दगडफेक करणाऱ्या आरोपी अमर भाकरे याने २९ एप्रिल रोजी गुप्त यांच्यावर धारदार शास्त्राने जीवघेणा हल्ला केला.

आरोपीस अटक : कर्ज प्रकरण नाकारल्याने झाला हल्ला

चिखली :  कर्ज प्रकरण नामंजूर केल्याचा राग मनात ठेवून यापूर्वी एकदा चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त यांच्या कार वर दगडफेक करणाऱ्या आरोपी अमर भाकरे याने २९ एप्रिल रोजी गुप्त यांच्यावर धारदार शास्त्राने जीवघेणा हल्ला केला. मात्र गुप्त व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रसंगावधान राखून हल्ला परतवून लावल्याने या हल्ल्यातून सतीष गुप्त थोडक्यात बचावले. दरम्यान ही बातमी कळताच शेकडोचा जमाव पोलीस ठाण्यात जमा झाला होता. मात्र, संतप्त जमावला गुप्त यांनी शांत राहण्याचे आवाहन केल्यामुळे पुढील अनुचित टळला. दरम्यान सतीश गुप्त यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अमर भाकरे यास ताब्यात घेतले आहे.

आरोपी अमर गोविंदराव भाकरे याने चार वर्षांपूर्वी चिखली अर्बन बँकेकडे कर्ज प्रस्ताव सादर केला होता. त्याचा प्रस्ताव बँकेच्या संचालक मंडळाने काही कारणांमुळे नामंजूर केला होता. या गोष्टीचा राग मनात धरून अमर भाकरे याने चार वर्षांपूर्वी सतीश गुप्त यांच्या कार वर दगडफेक करून हल्ला चढवला होता. यासंबंधीची फिर्याद गुप्त यांनी तेव्हाच चिखली पोलिसांकडे दिली होती. काल याची पुनरावृत्ती झाली. रात्री साडेआठच्या सुमारास बँकेचे कामकाज आटोपून आपल्या सहकाऱ्यांसह परत जाण्याच्या तयारीत असलेले सतीश गुप्त हे बँकेसमोर रस्त्यावर उभे असता समोरून वेगात मोटार सायकल घेऊन अमर भाकरे त्यांच्या अंगावर येऊन धडकला. मोटारसायकल उभी करून त्याने अकस्मात गुप्त यांची कॉलर पकडून असभ्य शब्दात बोलायला सुरूवात केली. ह्यतू माझे कर्ज नामंजूर केलेस, माझ्या हातून तू एकदा वाचलास परंतू, आता मी तुला जिवंत सोडणार नाहीह्ण अश्या शब्दात त्याने गुप्त यांना जीवे मारण्याची धमकी दिली. एवढ्यवरच न थांबता त्याने मोटारसायकलच्या डिक्कीतून धारदार विळा काढून गुप्त यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला. सतीश गुप्त व त्यांच्यासह तेव्हा घटनास्थळी असलेले संचालक पुरूषोत्तम दिवटे, राजेंद्र शेटे, अभिजित नेटके व सुभाष राऊत यांनी अमर भाकरे यास वेळीच रोखले, त्यामुळे पुढील अनर्थ टाळला.

या झटापटीत आरोपी अमर भाकरे घटनास्थळावरून पसार झाला. गुप्त यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्याचे वृत्त शहरात वाऱ्यासारखे पसरले. लगोलग गुप्त यांचे चाहते, कार्यकर्ते आणि युवक असा शेकडोंचा जमाव पोलीस ठाण्याच्या आवारात जमा झाला. या संतप्त जमावाला मोबाईलवरून फोन वरून शांतता राखण्याचे आवाहन गुप्त यांनी केले. परिणामी कसलाही अनुचित प्रकार घडला नाही. दरम्यान गुप्त यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून ठाणेदार महेंद्र देशमुख यांनी तातडीने कारवाई करीत अमर भाकरे यास त्याच्या घरून ताब्यात घेतले असून याप्रकरणी कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रांत पाटील करीत आहेत.