खामगाव : लक्झरीने कारला धडक दिल्याने कारचालक किरकोळ जखमी झाला. ही घटना रविवारी रात्री सुटाळा बु.नजीक घडली. शहरातील गवळीपुरा भागातील शे.जुबेर शे.इब्राहिम (वय २७) हा रात्री १.३० वाजतादरम्यान कार क्रमांक एम.एच.१९ बीयु २०५० ने जात असताना सुटाळा बु.नजीक समोरुन येणाऱ्या लक्झरी क्रमांक एम.पी.०९ एफए ५७०२ च्या चालकाने कारला धडक दिली. या अपघातात कारचे नुकसान झाले तसेच कारचालक किरकोळ जखमी झाला. याप्रकरणी कारचालकाने शहर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी लक्झरीचालक संतोषसिंग कोठारे याच्याविरुध्द कलम २७९, ४२७ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}