शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

शुद्ध पाण्याचा नावाखाली बुलडाण्यात आरोग्याशी खेळ

By admin | Updated: March 22, 2017 02:18 IST

विंधन विहिरींचे पाणी धोकादायक; नियमावली नाही

हर्षनंदन वाघ बुलडाणा, दि. २१- उन्हाळय़ाच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय तेजीत आला असून यासाठी विंधन विहिरीतील पाण्याचा उपयोग करण्यात येत आहे. मात्र बहुतेक विहिरींचे पाणी क्षारयुक्त आहे. पाण्याची शुद्धता तपासणीसाठी प्रशासनाकडे नियमावलीच नसल्याने जारचे पाणी शुद्ध आहे हे तपासायचे कोणी, असा प्रश्न अन्न व औषध विभागासमोर आहे. गत चार वर्षातील अवर्षणामुळे शुद्ध पाण्यासाठी नागरिकांचा बाटलीबंद पाण्याकडे ओढा वाढला आहे. जिल्ह्यात दहा लिटर पाण्याची जार ३0 ते ३५ रुपयांना विकली जाते. या पाण्याचा पुरवठा करणार्‍यासाठी शहरात अनेक ठिकाणी दुकाने थाटली आहेत. मात्र या पाण्याच्या शुद्धतेवर प्रश्नचिन्ह कायम आहेत. यामध्ये विहिरीचे पाणी वापरण्यात येते. या जारबंद पाण्यातील टिडीएस (क्षार तपासणी यंत्र) तपसणी करण्यात आली असता क्षारचे प्रमाण ५६0 पीपीएम (पार्ट पर मिलीयन) निघाले. दरम्यान, पाण्याची शुद्धता तपासून कारवाई करण्याच्यादृष्टिने प्रशासकीय विभागाकडे कोणती नियमावली नसल्याने या प्रकाराला पायाबंद घालणे अवघड झाले आहे.  जारद्वारे पाणी विक्रीबाबत कोणतीच शासकीय नियमावली नसल्यामुळे कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. - अनिल माहुरे, अधिकारी, अन्न व औषध प्रशासन, बुलडाणा.