शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पंचायतराज सशक्तीकरण अभियानात बुलडाणा अव्वल

By admin | Updated: October 3, 2016 02:57 IST

जिल्ह्यातील ८८.९६ टक्के काम पुर्ण झाले असून ८६९ पैकी ८६0 ग्रामपंचायती ऑनलाइन झाल्या आहेत.

हर्षनंदन वाघ बुलडाणा, दि. 0२- पंचायतराज बळकटीकरणासाठी केंद्र शासनाने पंचायत सशक्तीकरण अभियान सुरू केले असून ग्रामीण भागाचा उद्धार जास्तीत जास्त प्रमाणात कसा केला जाईल, या उद्देशाने या अभियानांतर्गत काम करण्यात येते. या अभियानांतर्गत अमरावती विभागात बुलडाणा जिल्ह्याने अव्वल स्थान प्राप्त केले असून ८६९ ग्राम पंचायतींपैकी ८६0 ग्रामपंचायती ऑनलाइन झाल्या आहेत.ग्रामीण प्रशासन आणि सामाजिक, आर्थिक विकास पंचायत महत्त्वाची भूमिका १९५0 पासून ओळखली गेली आहे. पंचायतच्या योजनांचा लाभ लोकांना पोहोचवण्याची खात्री करणे शासनाला महत्त्वाचे वाटते. म्हणून पंचायत बळकट करण्यासाठीची गरज, समाजकल्याण आणि समाविष्ट कार्यक्रमांवर झालेल्या खर्चाचा आढावा घेण्यात येतो. याबाबत ग्रामपंचायतीयच्या कामाचे मूल्यमापन ऑनलाइन भरण्यात येते. या कामात अमरावती विभागात बुलडाणा जिल्ह्याचे प्रथम स्थान मिळविले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यातील ८६९ ग्रामपंचायतीपैकी ८६0 ग्रामपंचायती ऑनलाइन झाल्या आहेत. त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील १६ तालुक्यातील १२१0 ग्राम पंचायतींपैकी ३४ ग्रामपंचायती ऑनलाइन झाल्या असून त्याची टक्केवारी २.८0 आहे. अकोला जिल्ह्यातील ७ तालुक्यातील ५४२ ग्रामपंचायतींपैकी फक्त ९ ग्रामपंचायती ऑनलाइन झाल्या असून त्याची टक्केवारी २.६६ आहे. वाशिम जिल्ह्यातील ६ तालुक्या तील ४९३ ग्रामपंचायतींपैकी १५ ग्रामपंचायती ऑनलाइन झाल्या असून त्याची टक्केवारी ३ आहे. तर अमरावती जिल्ह्यातील १४ तालुक्यांतर्गत येणार्‍या ८४३ ग्रामपंचायतीं पैकी फक्त १0 ग्रामपंचायती ऑनलाइन झाल्या असून त्यांची टक्केवारी १.१८ आहे.ऑनलाइन ग्रामपंचायतींमुळे कामाला गतीअमरावती विभागातील बुलडाणा जिल्ह्यातील ८६0 ग्रामपंचायती ऑनलाइन झाल्यामुळे ग्रामीण भागातील विकास कामांची माहिती त्वरित वरिष्ठांकडे पाठविण्याच्या कामाला गती आली आहे. या माध्यमातून कामकाजात येणार्‍या अडचणी सोडविण्यावर भर देण्यात येत असून खर्‍या अर्थाने बुलडाणा जिल्ह्यात डिजिटल इंडियाचे स्वप्न पूर्ण झाले आहे.