शहरं
Join us  
Trending Stories
1
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
4
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
5
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
6
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
7
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
8
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
9
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
10
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
11
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
12
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
13
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
14
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
15
‘अटक ते कटक’ नकाशावरून महाराष्ट्रात संताप का?; मराठा साम्राज्याचा नकाशाच केला गायब
16
देशाबाहेर जाणारा पैसा अडविण्याची हिंमत हवी! हा भारताच्या स्वयंनिर्भरतेच्या आत्म्यावरच आघात
17
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
18
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
19
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
20
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
Daily Top 2Weekly Top 5

अल्प उत्पन्नात बुलडाणेकरांचे घराचे स्वप्न साकारणार!

By admin | Updated: April 15, 2017 00:23 IST

हर्षवर्धन सपकाळ यांचा पाठपुरावा : म्हाडाच्या ३०४ घरांचा प्रकल्प मंजूर

बुलडाणा : तब्बल सहा वर्षांपासून रखडलेला महाराष्ट्र गृह निर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या बुलडाणा येथील गृह निर्माण योजनेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी मार्गी लावला असून, या माध्यमातून बुलडाणेकरांना ३०४ घरे पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. अंदाजे २० कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पास शासनाची मंजुरी मिळाली आहे.बुलडाणा नागरी क्षेत्रासाठी महाराष्ट्र गृह निर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे सन २०१० मध्ये गृह निर्माण योजनेसाठी शेत सर्व्हे क्रमांक ५२ व ५३ मधील सुमारे चार हेक्टर जमीन खरेदी करण्यात आलेली होती. तथापि सदर जमिनीवर उभारावयाचा गृह निर्माण प्रकल्प मात्र रखडलेला होता. यामुळे बुलडाणा शहरातील अनेक अल्प उत्पन्न गटातील कुटुंबे हक्काच्या घरापासून अनेक वर्षापासून वंचित राहिलेली आहेत. या पार्श्वभूमीवर आ. सपकाळ यांनी गृह निर्माण मंत्रालयाकडे पाठपुरावा सुरू केला होता. सोबतच सन २०१६ मध्ये विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय व पावसाळी अधिवेशनात सूचनासुद्धा सादर केल्या. तसेच विधिमंडळ पातळीवर पाठपुरावा सुरू ठेवला होता.दरम्यान, आ. सपकाळ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अल्प उत्पन्न गटातील बुलडाणेकरांचे हक्काच्या घराचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. म्हाडाच्या सदर प्रकल्पास पंतप्रधान आवास योजनेंतर्गत २० कोटी रुपये मंजूर झाले असून, त्यामध्ये ३०४ घरांची उभारणी केली जाणार आहे. या ३०४ पैकी २६८ घरे ही अल्प उत्पन्न गटासाठी प्राधान्याने देण्यात येणार आहेत. मध्यम उत्पन्न गटासाठी २० व उच्च उत्पन्न गटासाठी १६ घरांची उभारणी होणार आहे. आ. हर्षवर्धन सपकाळ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांना चालून आली आहे. विशेष उल्लेखनीय असे की, यामध्ये निकषपात्र ठरणाऱ्या अल्प उत्पन्न गटातील कुटुंबास केंद्र शासनाचे दीड लाख, तर राज्य शासनाचे एक लाख असे अडीच लाख रुपये अनुदानसुद्धा या घरासाठी मिळणार आहे.