शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात काेराेना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४ टक्क्यांनी वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 11:10 IST

Buldhana Corona News : गेल्या दीड महिन्यात बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चार टक्क्यांनी वाढल्याचे दिलासादायक वृत्त आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: गेल्या दीड महिन्यात जिल्ह्यात १२३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू व तब्बल २९ हजार ७९४ जण कोरोना बाधित आढळून आल्याने कोरोनाचे संक्रमण जिल्ह्यात आणखी वेगाने वाढते की काय अशी भीती वाटत असतानाच गेल्या दीड महिन्यात बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चार टक्क्यांनी वाढल्याचे दिलासादायक वृत्त आहे. अद्याप यापूर्वीचे महत्तमस्तर असे ९६ टक्के प्रमाण अद्याप जिल्ह्याने गाठलेले नसले तरी ८४ टक्क्यांवर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८ टक्क्यावर आले आहे ही एक सकारात्मक बाब म्हणावी लागले. विशेष म्हणजे गेल्या दीड महिन्यात जिल्ह्यात महत्तमस्तरावर अशा १ लाख ७७ हजार नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.  विशेष म्हणजे गेल्या दीड महिन्यात १७ टक्के पॉझिटिव्हिटी रेट जिल्ह्यात कायम होता. तोही आता येत्या काळात घटण्याची शक्यता आरोग्य क्षेत्रातील जाणकारांनी दिली आहे. सध्याचा सरासरी पॉझिटिव्हिटी रेट १४ टक्क्यांवर स्थिरावला असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.एकंदरीत बुलडाणा जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात आतापर्यंतच्या सर्वाधिक अशा कोरोना चाचण्या झाल्या आहेत. गेल्या वर्षभरात १ लाख ६४ हजार संदिग्धांच्या जिल्ह्यात कोरोना चाचण्या झाल्या होता. त्या तुलनेत गेल्या दीड महिन्यात विक्रमी अशा १ लाख ७७ हजार संदिग्धांच्या चाचण्या झाल्या आहेत. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याअखेर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ८४ टक्क्यांवर घसरले होते. ते एप्रिल महिन्याच्या मध्यावर ४ टक्क्यांनी वाढून ८८ टक्के झाले आहे. त्यावरून जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा डाऊनफॉल सुरू झाला की काय असा कयासही व्यक्त केला जात आहे.त्यातच १५ दिवसाच्या संचारबंदी व कडक निर्बंधाचा फायदाही जिल्ह्यातील काेराेना संक्रमणाची गती कमी हाेण्यास मिळेल. त्याची फक्त प्रभावी अंमलबजावणी हाेण्याची गरज आहे. 

मृत्युदरही घसरलावरकरणी बुलडाणा जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात १२३ जणांचा मृत्यू झाल्याचे दिसत असले तरी मार्च महिन्याच्या प्रारंभी बुलडाणा जिल्ह्याचा मृत्युदर हा १.०४ टक्के होता तो १४ एप्रिल रोजी ०.६४ टक्क्यांवर आला आहे. हीपण जिल्ह्याच्या दृष्टीने दिलासादायक बाब म्हणावी लागले.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याbuldhanaबुलडाणा