शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

वैरागड तलावासाठी वाढीव मापदंडानुसार अंदाजपत्रक

By admin | Updated: April 19, 2017 00:03 IST

राहुल बोंद्रे यांच्या प्रयत्नांना यश : अंतिम प्रशासकीय मान्यतेचा मार्ग मोकळा

चिखली: मतदारसंघातील २४७ हेक्टर सिंचन क्षमतेच्या वैरागड संग्राहक तलावासंदर्भाने असलेल्या विविध अडचणी दूर करीत आमदार राहुल बोंद्रे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर गत १० एप्रिल रोजी या तलावासाठीच्या वाढीव मापदंडानुसार अंदाजपत्रक संबंधित विभागाने शासनाकडे सादर केले आहे. त्यामुळे या संग्राहक तलावाच्या अंतिम प्रशासकीय मान्यतेचा मार्ग मोकळा झाला आहे. चिखली मतदारसंघातील सिंचनाची गरज लक्षात घेता वैरागड संग्राहक तलाव पूर्ण व्हावा, अशी अपेक्षा वैरागड व परीसरातील शेतकरी व नागरिकांना आहे; मात्र या तलावास मान्यता असतानाही त्याचे काम सुरू होण्यास बरेच अडथळे निर्माण झाले होत. पूर्वी २७६ हेक्टर सिंचन क्षमता लक्षात घेऊन या तलावाचा आराखडा तयार करण्यात आला होता;़ मात्र दरम्यानच्या काळात राज्यपालांच्या आदेशानुसार २५० हेक्टरपेक्षा जास्त क्षमतेचे प्रकल्प सुरू करण्यास मनाई करण्यात आली होती़ त्यामुळे या संग्राहक तलावाचा प्रस्ताव जलसंपदा विभागाने अडगळीत टाकला होता; मात्र वैरागड व परिसरातील नागरिकांची गरज लक्षात घेता, आमदार राहुल बोंद्रे यांनी प्रयत्नपूर्वक हा तलाव २४७ हेक्टर सिंचन क्षमतेचा करून घेत ११ जून २०१४ रोजी जलसंपदा विभागाकडून जलसंधारण विभागाकडे हास्तांतरित करून घेतला़ व त्यासाठी कार्यकारी अभियंता लघुसिंचन बुलडाणा यांना अंदाजपत्रक सादर करण्यासंदर्भात पाठपुरावा केला होता. तथापि, याप्रकरणी विधानसभेत सतत प्रश्न उपस्थित करून ना. विजय शिवतारे, जलसंधारण विभागाचे सचिव कृष्णराव देशमुख यांच्या सोबत मंत्रालयात बैठकीही घडून आणत या संग्राहक तलावास गती देण्याचा सतत प्रयत्न केल्याने २९ मार्च २०१७ रोजी विधानभवन मुंबई येथे जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांची याबाबत बैठक आयोजन करून शासनाला वैरागड संग्राहक तलावासाठी वाढीव मापदंडानुसार अंदाजपत्रके सादर करण्याचे निर्देशही देण्यास भाग पाडले होते़ तर ७ एप्रिल २०१७ रोजी विधानसभा अध्यक्षांकडे तलावाचे काम सुरू होण्याबाबत विनंती अर्ज सभागृहाकडे सादर केला होता त्यानुसार १० एप्रिल रोजी मुख्य अभियंता, विदर्भ सदन सिंचन विकास कार्यक्रम यांनी सदरहू योजनेचे अंदाजपत्रक शासनास सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे १३ एप्रिल रोजी वैरागड संग्राहक तलावासाठी वाढीव मापदंडानुसार अंदाज पत्रक मंत्रालय मुंबई येथे जलसंधारण विभागात सादर झाले असल्याने आ. राहुल बोंद्रे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. दरम्यान सदर अंदाज पत्रकास तातडीने प्रशासकीय मान्यता देऊन वैरागड संग्राहक तलावाचे कामकाज सुरू व्हावे, अशी विनंतीही १७ एप्रिल रोजी पत्राद्वारे जलसंधारण मंत्री ना.प्रा़ राम शिंदे यांच्याकडे आ. राहुल बोंद्रे यांनी केली आहे.