चारित्र्याच्या संशयातून पत्नी व चार वर्षीय मुलाचा निर्घृण खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 07:21 IST2025-12-30T07:21:18+5:302025-12-30T07:21:18+5:30
या घटनेत रूपाली राहुल म्हस्के (वय ३०) व तिचा चार वर्षीय मुलगा रियांश राहुल म्हस्के यांचा मृत्यू झाला.

चारित्र्याच्या संशयातून पत्नी व चार वर्षीय मुलाचा निर्घृण खून
मेहकर (जि. बुलढाणा) : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने झोपेत असलेल्या पत्नीचा, तसेच अवघ्या चार वर्षांच्या चिमुकल्याचा कुऱ्हाडीचे घाव घालून खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी उत्तररात्री मेहकर शहरात घडली. या घटनेत रूपाली राहुल म्हस्के (वय ३०) व तिचा चार वर्षीय मुलगा रियांश राहुल म्हस्के यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी आरोपी पती राहुल हरी म्हस्के (वय ३५) याच्याविरुद्ध मेहकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत रूपालीचे वडील भास्कर शंकर वानखेडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.
रविवारी रात्री सर्व जण गाढ झोपेत असताना राहुलने झोपेत असलेल्या रूपाली व रियांश यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने घाव घातले. आरडाओरड झाल्याने आरोपीची आई ताराबाई म्हस्के यांना जाग आली. त्यांनी शेजाऱ्यांना बोलावले. गंभीर जखमी रूपालीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.