शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
3
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
4
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
5
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
6
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
7
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
8
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
9
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
10
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
11
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
12
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
13
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
14
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
15
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
16
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
17
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
18
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
19
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
20
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
Daily Top 2Weekly Top 5

पितळे महाराजांचा ‘प्रणव अवतार महोत्सव’ सातासमुद्रापार!

By admin | Updated: January 11, 2015 00:25 IST

कर्मभूमी मेहकर असलेल्या पितळे महाराजांचा न्यूजर्सीतही होणार महोत्सव.

ब्रम्हानंद जाधव / मेहकर विदर्भात वारकरी भक्तीपरंपरेचे बीजारोपण करणारे आणि कपाळी बुक्क्यासोबत अष्टगंध लावण्याची प्रथा रुढ करणारे, मेहकर कर्मभूमी असलेले संत बाळाभाऊ महाराज पितळे यांचा प्रणव अवतार महोत्सव आता सातासमुद्रापार पोहोचला आहे. हा महोत्सव १७ ते १९ जानेवारीदरम्यान न्यूजर्सी, पॅरिससह दिल्ली, वाराणसीतही साजरा होणार आहे.बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथे सन १८८८ ला जन्मलेले थोर संत बाळाभाऊ महाराज पितळे ऊर्फ श्‍वासानंद सरस्वती यांना मानणारा भक्तवर्ग महाराष्ट्रासह परप्रांतातही विखुरलेला आहे. त्यांनी जातीभेद निर्मूलन, धर्मशुद्धीकरण व समाज परिवर्तनासाठी लक्षणीय कार्य केले. नाथ संप्रदाय, दत्त संप्रदाय व वारकरी संप्रदायाचा त्यांनी त्रिवेणी संगम घडवून आणला. महाराणी अहल्याबाई होळकरांचे राजवारस मार्तंडराव होळकर यांनी संत बाळाभाऊ महाराजांचे शिष्यत्व पत्करले होते. अवघ्या ४२ वर्षांच्या जीवनकालात चारही आश्रमांचे पालन करुन परमहंस दीक्षा घेऊन त्यांनी उत्तरप्रदेशातल्या वाराणसी येथे ह्यसमाधीह्ण घेतली. महाराजांना मानणारा भक्तवर्ग आज महाराष्ट्रातच नव्हे तर देश-विदेशातही विखुरलेला आहे. त्यांच्या गुरूगादीवरील विद्यमान श्रीगुरू अँड. रंगनाथ महाराज पितळे यांच्या पावन उपस्थितीत मेहकर येथील श्रीक्षेत्र ज्ञानमंदिरात संत बाळाभाऊ महाराजांचा ८५ वा प्रणव अवतार महोत्सव १७ ते १९ जानेवारी या कालावधीत साजरा होणार आहे. त्यामध्ये कीर्तने, प्रवचने, दिंडी परिक्रमा, हरिपाठ, काकडा, गोलरिंगण, भारूडे, महाप्रसाद अश्या भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल आहे. या प्रमुख महोत्सवासोबतच दिल्ली, वाराणसी, अमेरिकेतील न्यूजर्सी, फ्रान्समधील पॅरिस यांसह महाराष्ट्रात सुमारे ३५ ठिकाणी हा महोत्सव साजरा होत आहे; तसेच दरवर्षी या महोत्सवाच्या संख्येत भर पडत आहे. दरम्यान उपजीविकेच्या निमित्ताने देश सोडून विदेशात स्थायिक व्हावे लागले. जेथे राहतो तेथेच 'ज्ञानमंदिर' आहे; असे समजून श्रीगुरू रंगनाथ महाराजांच्या प्रेरणेने संत बाळाभाऊ महाराजांचा प्रणव अवतार महोत्सव अमेरिकेतच आम्ही साजरा करीत असल्याचे अमेरिकेतील न्यूजर्सी येथील शशांक पिंगळे यांनी सांगीतले.