बुलडाणा : शेतकरी कर्जमाफीसाठी विधीमंडळात गदारोळ घातल्यामुळे जिल्यातीलकाँग्रेसचे आमदार राहूल बोंद्रे व हर्षवर्धन सपकाळ यांना निलंबित करण्यातआले आहे. या सर्वांचं ३१ डिसेंबरपर्यंत निलंबन करण्यात यावं, असा प्रस्ताव संसदीयकार्यमंत्री गिरीष बापट यांनी दिला. तो मान्य करण्यात आला. अर्थमंत्रीसुधीर मुनगंटीवार हे १८ मार्चला अर्थसंकल्प मांडत असताना, विरोधीपक्षांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत गदारोळ घातला होता. टाळ वाजवतविरोधकांनी कर्जमाफीसाठी आग्रह धरला होता. सभागृहात गोंधळ घालणे, बॅनरफडकावणे, घोषणाबाजी करणे, अवमान करणे, अर्थसंकल्पाच्या प्रती जाळणे,सभागृहाची प्रतिमा मलिन करणे, सभागृहाचे अवमान करणे असे आरोप ठेवूनदोन्ही आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}