बोराखेडी व खेडी शाळेस ‘आयएसओ’ मानांकन

By Admin | Updated: May 1, 2017 13:59 IST2017-05-01T13:59:17+5:302017-05-01T13:59:17+5:30

बोराखेडी वखेडी या दोन शाळांना आयएसओ मानांकन मिळाले आहे.

Boracardi and Khedi School 'ISO' Rankings | बोराखेडी व खेडी शाळेस ‘आयएसओ’ मानांकन

बोराखेडी व खेडी शाळेस ‘आयएसओ’ मानांकन

मोताळा: तालुक्यातील शिक्षण विभागाने प्रगतीच्या दिशेने एक पाऊल टाकण्यास
सुरूवात केली आहे. विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबविल्यामुळे बोराखेडी व
खेडी या दोन शाळांना आयएसओ मानांकन मिळाले आहे. मोताळा तालुक्यातील या
पहिल्याच शाळा आहेत.
        बोराखेडी येथील शाळा मोताळा केंद्रांतर्गत असून १ ते ८ पर्यंतचे
वर्ग आहे. शाळेमध्ये मुख्याध्यापकासह ८ शिक्षक व ३०६ विद्यार्थी संख्या
आहे. खेडी येथील शाळेत मुख्याध्यापकासह ३ शिक्षक व ७५ विद्यार्थी संख्या
आहे. दोन्ही शाळा शंभर टक्के उपक्रमशील असून सभारंभानुसार रांगोळी
रेखाटन, शब्द वाचु सारे, मी मांडते आपले मत, गणिती खेळ, ई-लर्निंगद्वारे
अध्ययन अध्यापन, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, बोलत्या भिंती, सुसज्ज
ग्रंथालय, मातीकाम इत्यादीं उपक्रमांचे शाळेत आयोजन करण्यात येते. त्याच
बरोबर शालेय अभिलेखे, शालेय भौतिक सुविद्या अतिशय दर्जेदार करण्यात आल्या
आहेत. तज्ञांसह, अधिकारी, पदाधिकारी व जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील २५००
शिक्षकांनी या शाळांना वेळोवेळी भेटी देऊन विविध उपक्रमांची माहिती जाणून
घेतली आहे. विद्यार्थ्यांचा गुणात्मक विकास होण्याबरोबरच सर्वांगिण विकास
व्हावा म्हणून या शाळांनी नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यास सुरूवात
केल्यामुळे बोराखेडी व खेडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळांना आयएसओ
मानांकन प्राप्त झाले आहे. २४ एप्रिल रोजी सहकार विद्या मंदिर बुलडाणा
येथे कृषी मंत्री तथा पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर, वस्त्रोद्योग
महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, आमदार हर्षवर्धन सपकाळ, जि.प.अध्यक्षा
उमा तायडे, जि. प. मुख्यकार्यकारी अधिकारी दीपा मुधोळसह सर्व सभापती
यांच्या उपस्थितीत व मान्यवरांच्या हस्ते बोराखेडी व खेडी येथील जिल्हा
परिषदेच्या शाळांना आयएसओ मानांकन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

Web Title: Boracardi and Khedi School 'ISO' Rankings