शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

दोन चिमुकल्यांसह मातेचा मृतदेह तलावात आढळला; पिंप्री गवळी येथील लघू प्रकल्पात कुजले मृतदेह

By अनिल गवई | Updated: August 26, 2024 21:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : तालुक्यातील पिंप्री गवळी येथील लघू प्रकल्पात दोन चिमुकल्यांसह एका मातेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून ...

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : तालुक्यातील पिंप्री गवळी येथील लघू प्रकल्पात दोन चिमुकल्यांसह एका मातेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. हा धक्कादायक प्रकार सोमवारी सायंकाळी उघडकीस आला. या प्रकारामुळे खामगाव शहरासह परिसरात एकच खळबळ उडाली. खामगाव ग्रामीण पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, खामगाव तालुक्यातील पिंप्री गवळी येथील तलावात सोमवारी सायंकाळी दोन चिमुकल्यांसह मातेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत स्थानिकांना आढळून आला. या घटनेची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच खामगाव ग्रामीण पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. प्रथमदर्शनी तिन्ही मृतदेह एकमेकांना कपड्याने बांधलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यामुळे मातेने चिमुकल्यांसह आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. स्थळ निरीक्षण आणि पंचनाम्यानंतर तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले आहेत.....

अशी आहेत मृतांची नावे

पार्वती प्रकाश इंगळे (३०)आर्यन प्रकाश इंगळे (०८)

प्राची प्रकाश इंगळे (०५)...

आकस्मिक मृत्यूची नोंदयाप्रकरणी मृतक महिलेचे वडील मुरलीधर गोंडू खंडारे (५२) रा. जळका भडंग ह.मु. पिंप्री गवळी यांच्या तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलिसांनी बीएनएसएस कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास खामगाव ग्रामीण पोलिस करीत आहेत.

..........पतीपासून होती विभक्त

मृतक महिला पार्वती इंगळे ही अकोला जिल्ह्यातील दहिगाव गावंडे येथील रहिवासी असून पतीसोबत पटत नसल्याने पिंप्री गवळी येथे राहत होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वी ती मुलांसह घरून निघून गेली होती. दरम्यान, सोमवारी सायंकाळी मुलांसह या महिलेचा मृतदेह आढळून आला.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणे