शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
2
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
3
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
4
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
5
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
6
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
7
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
8
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
9
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
10
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
11
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
12
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
13
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
14
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
18
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
19
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
20
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
Daily Top 2Weekly Top 5

पश्‍चिम व-हाडावर भाजपचे वर्चस्व, राकाँचा सफाया

By admin | Updated: October 20, 2014 00:24 IST

१५ पैकी ९ मतदारसंघ भाजपच्या ताब्यात, काँग्रेसच्या खात्यात तीन, तर शिवसेनेच्या खात्यात दोन जागा.

अकोला: यूती आणि आघाडीतील घटस्फोटामुळे झालेले मतविभाजन आणि काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडखोरीचे परिणाम पश्‍चिम वर्‍हाडातील अकोला, बुलडाणा आणि वाशिम या तिन्ही जिल्ह्यातील मतदारसंघांच्या निकालावर दिसून आले. तिन्ही जिल्ह्यातील १५ पैकी ९ मतदारसंघांवर भाजपने ताबा मिळवला. काँग्रेसला तीन मतदारसंघांमध्ये, तर शिवसेनेला दोन मतदारसंघांवर विजय मिळवता आला. राष्ट्रवादी काँग्रेसचा या भागातून सफाया झाला असून, भारिप-बहूजन महासंघाला केवळ एका जागेवर विजय मिळवता आला. अकोला जिल्ह्यातील पाचपैकी चार मतदारसंघांमध्ये विजयश्री मिळवून भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. आकोटमध्ये प्रकाश भारसाकळे यांनी काँग्रेसचे महेश सुधाकर गणगणे यांचा ३१४११ मतांनी पराभव केला. भारसाकळे यांना जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य मिळाले. भारिप-बमसंने बाळापूरचा गड कायम राखला. बळीराम सिरस्कार यांनी तिरंगी लढतीत काँग्रेसचे सै. नातिकोद्दिन खतीब आणि भाजपचे तेजराव थोरात यांना पराभूत केले. अकोला पश्‍चिममध्ये गोवर्धन शर्मा सलग पाचव्यांदा विजयी झालेत. त्यांनी ६६९३४ मतं मिळवून राकाँचे विजय देशमुख यांच्यावर ३९९५३ मतांनी विजय मिळविला. अकोला पूर्वमध्ये भाजपचे रणधीर सावरकर यांनी भारिप-बहुजन महासंघाचे विद्यमान आमदार हरिदास भदे यांच्यावर २४४0 मतांनी निसटता विजय मिळविला. मूर्तिजापूरमध्ये आमदार हरीश पिंपळे यांनी भाजपचा गड दुसर्‍यांदा राखला. वाशिम जिल्ह्यातील वाशिम आणि कारंजा, या दोन मतदारसंघांत भाजपने विजय मिळवला असून, भाजपच्या लाटेतही काँग्रेसने रिसोड मतदारसंघावरील वर्चस्व कायम ठेवले आहे. वाशिम मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार लखन मलिक यांनी पुन्हा एकदा बाजी मारली. कारंजा मतदारसंघाची निवडणूक यावेळी लक्षवेधी ठरली. शिवसेनेचे माजी आमदार राजेंद्र पाटणी हे या मतदारसंघातून भाजपतर्फे निवडणूक रिंगणात होते. मोदींची लाट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीमुळे या मतदारसंघात राजेंद्र पाटणी यांना विजय मिळाला. रिसोड मतदारसंघावर काँग्रेसने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. या मतदारसंघात यावेळीही काँग्रेसचे अमित झनक आणि भाजपचे विजय जाधव यांच्यातच खरी लढत झाली. जाधव यांचे कडवे आव्हान झनक यांनी लिलया पेलून, १५ हजारापेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला. बुलडाणा जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल हे बदलत्या राजकारणाची नांदी ठरली आहे. दिलीपकुमार सानंदा, विजयराज शिंदे आणि धृपदराव सावळेंसह रेखाताई खेडेकर या दिग्गजांना पराभूत करून, मतदारांनी नव्या चेहर्‍यांना पसंती दिली आहे. जिल्ह्यातील सात मतदारसंघांपैकी तीन भाजप, तर काँग्रेस व शिवसेना प्रत्येकी दोन जागांवर विजयी झाली.